आलूरच्या महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

उमरगा -  उमरगा तालुक्यातील आलूर येथील वीरशैव लिंगायत मठाच्या  महाराजांवर मुरूम पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुशांत शिवाचार्य असे या महाराजाचे नाव आहे.

महिला दिनादिवशी म्हणजे ८ मार्च रोजी गावातील एक महिला या मठात दर्शनासाठी गेली होती. यावेळी मठाचे  महाराज  सुशांत शिवाचार्य यांनी हात धरून वाईट हेतूने खोलीमध्ये ओढल्याची तक्रार या महिलेने केली आहे. सदर महिला घरी जावून झालेला प्रकार सांगिल्यानंतर काही लोक या महाराजाला  जाब विचारण्यासाठी गेले असता,  सुशांत शिवाचार्य महाराज यांनी मुरूम पोलीस स्टेशनमध्ये काही लोकांविरुद्ध मारहाणीची तक्रार नोंदवली, त्यानंतर या लोकांनी या महाराजांवर विनयभंगाची तक्रार नोंदवली. 

महिलेच्या तक्रारीनंतर सुशांत शिवाचार्य महाराज यांच्यासह तिघाजणांविरुद्ध मुरूम पोलीस स्टेशनमध्ये १० मार्च रोजी ३५४, ३५४ -A , ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  सुशांत शिवाचार्य महाराज यांनी रंगेल चाळे केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

आलूरच्या मठाचा मठाधिपती होण्यासाठी दोन गटात वाद असून, या वादातून मठाधिपती असलेल्या सुशांत शिवाचार्य महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप काही लोक करत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post