![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXG0jKHePZFQc7fq6aaIhFjbIHNiqESdi5GOyhSoI_FdB7rpW3Zu-e2DBUKwfpqGt5a_8auJzd1hDC8fisOUDGXfNKm-USVNG8kJjt9RqDD6vOca-kqaga23ZFIIVSzk_Jy7kGTyYMecE9/s320/jitendra-awhad-ganesh-naik_202003384723.jpg)
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावर भाजप नेते गणेश नाईक यांनीही आव्हाडांना उत्तर दिलं. "तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक"
त्यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले, नाईक यांनी 90 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे, तो म्हणजे शरद पवार. त्याला उत्तर देताना गणेश नाईक यांनी, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे.
टिप्पणी पोस्ट करा