Google च्या ह्या 5 गंमतीशीर गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील...


इंटरनेट वापर करणे ही आता अगदीच सामान्य बाब आहे. या इंटरनेटमुळे आपल्याला एका क्लिकवर  कुठल्याही विषयावरील माहिती काही मिनीटांच्या आत उपलब्ध होत असते. आणि त्यात Google ची फारच महत्त्वाची भूमिका असते. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती दररोजच Google चा वापर वापर करत असते, या Google मध्ये काही मजेशीर ट्रिक्स आहेत ज्या तुमच्यामधील कोणाला थोड्याफार माहित असतीलही किंवा काहीजणांना माहित नसतील आणि म्हणूनच आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत.

 Google च्या 5 ट्रिक्स पुढीलप्रमाणे.. 

Barrel Roll

ही Google ची एक मजेदार ट्रिक आहे. हे पहाण्यासाठी आधी तुम्हाला Google वर जायचे आहे आणि do a barrel roll टाइप करायचे आहे. जेव्हा तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल तसे Google चे पेज स्वतहून आपलेआपणच दोनदा फिरले जाईल.

Askew

जर तुम्ही Google वर Askew टाइप करून एंटर कराल तर Google पेज थोडेसे टिल्ट झालेले/ उलटसुलट वेडेवाकडे झालेले जाणवेल, ही गंमतीदार ट्रिक तुम्ही नक्की करून पहा.


Google Gravity

ही तर खूपच मजेशीर ट्रिक आहे, ही मजा अनुभवण्यासाठी प्रथम तुम्ही Google च्या होमपेज  वर जा आणि Google Gravity टाइप करा मग “I’m feeling lucky” बटन हे सिलेक्ट करा त्यामुळे लगेचच Google चे पेज बदलेल आणि सगळे काही खाली पडलेले दिसेल.

Thanos

जर तुमच्यातील कोणी  Marvel  चे फैन असाल तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला मजा येईल जेव्हा Google वर तुम्ही Thanos टाइप कराल तेव्हा राइट साइड ला बायोग्राफीच्या जवळ Gauntlet यकौ  दिसेल त्यावर क्लिक केल्यास Google लिस्टिंग गायब होणे सुरू होईल.  

Zerg Rush

Google वर zerg rush टाइप केल्यावर “I’m feeling lucky” वर क्लिक करा त्यामुळे तुमच्या समोर Google पेज ओपन होईल आणि हळूहळू काही  दिसू लागेल जे वरून खाली येत असेल आणि एकीकडे ते  Google लिस्टिंग  गायबही करेल.

Post a Comment

Previous Post Next Post