उस्मानाबादेत नराधम शिक्षकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल


उस्मानाबाद - सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या एका विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करून गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षक मोहन सुरवसे याच्याविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधम शिक्षक मोहन सुरवसे हा त्याच्याच  शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका  १२ वर्षाच्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे करून गैरवर्तन  करत असल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले होते. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.

या नराधम शिक्षकास संतप्त झालेल्या जमावाने बेदम चोप देत पोलीस स्टेशनला नेल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी आणि काही काही स्थानिक पुढाऱ्यांनी  माफी मागून हे प्रकरण आपसात मिटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरल्यानंतर अखेर आरोपी मोहन सुरवसे याच्याविरुद्ध भादंवि ३५४, ३५४ -A, तसेच पोस्कचे कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मोहन सुरवसे यास आज दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार असून, त्यास किती दिवस पोलीस कोठडी मिळते, याकडे लक्ष वेधले आहे.

संबंधित वृत्त 

उस्मानाबादेत सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर शिक्षकाचे अश्लील चाळे


Post a Comment

Previous Post Next Post