गणेश नाईक यांना तीन बाप तर मला शरद पवार एकच बाप - आव्हाड


मुंबई : बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, तो म्हणजे  शरद पवार ! हा डायलॉग म्हटला आहे,  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी.   

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावर भाजप नेते गणेश नाईक यांनीही आव्हाडांना उत्तर दिलं. "तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक"


त्यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले, नाईक यांनी 90 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलल्याचं म्हटलं. अशी बाप बदलणाऱ्याची औलाद माझी नाही. माझा मरेपर्यंत एकच बाप आहे, तो म्हणजे शरद पवार. 

जेव्हा गरीब आगरी समाजाची घरं पडत होती. त्यावेळी नाईक तुम्ही कुठं होता. ही घरं वाचवण्यासाठी सीमांकन का वाढवलं नाही?, स्वतःच बावखळेश्वर मंदिर वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. मग, गरीब आगरी समाजासाठी तुम्ही का लढले नाहीत, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. ज्या समाजावर तुम्ही मोठं झालात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? जे तुम्हाला मिळालं ते माझ्या बापामुळेच. कारण, शरद पवार माझा बाप आहे, असंही आव्हाड सांगायला ते विसरले नाहीत. गणेश नाईक यांनी आजपर्यंत फक्त पैशाच्या जीवावर राजकारण केलं. मात्र, मी निष्ठेच्या जीवावर राजकारण करतो. त्यामुळे नवीमुंबईची लढाई ही गद्दार विरुद्द निष्ठावंत अशी होणार असल्याचंही आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.

Post a Comment

Previous Post Next Post