फेसबुक हॅन्डल करताना ही चूक पडू शकते महागात, त्यासाठी ही सेटिंग करा...

फेसबुक  Facebook समाज माध्यमाचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण करताना दिसतात. पण कधी कधी फेसबुकचा वापर करताना आपल्याकडून अगदी लहानशाही चुका होऊन बसतात ज्यामुळे आपली सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

अनेकवेळा आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या फोनवरून किंवा सायबर कॅफे मधून फेसबुकचे लॉगइन करतो खरे पण काम झाल्यावर लॉग आउट  करायला विसरून जातो. आणि ही बाब धोकादायक ठरू शकते कारण जर एखाद्याचा हेतू चांगला नसेल तर तो माणूस तुमचे फेसबुक अकाऊंट लॉग आउट करण्याच्या एवजी लऔगिन चालू ठेवून तुमच्या अकांऊटसोबत गैरवर्तन करू शकतो. आणि जर या गोष्टी टाळायच्या असतील तर कधी चुकून तुम्ही कुठे असे फेसबुकचे लोगिन करून विसरलात तर नाही ना हे तुम्हाला खातरजमा करून घेणे गरजेचे ठरेल. फेसबुकवर काही सेटिंग्सचा वापर करून तुम्ही या त्रासापासून नक्कीच वाचू शकाल. Facebook सेटिंग्स मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की आपले अकाउंट कुठे लॉगइन झालेले आहे.

 स्मार्टफोनचे सेटिंग्स अशा पद्धतीने करा

सर्वप्रथम Facebook एप सुरू करा. नंतर सेटिंग्समध्ये जाऊन खाली स्क्रोल केल्यावर Settings and Privacy हा विकल्प दिसेल, त्यावर टैप करून Settings वरती क्लिक करा. तिकडे काही विकल्प  दिसतील मग तिकडे  Security and login हा विकल्प निवडा. तिकडे तुम्हाला Where you're logged in असा विकल्प दिसेल, मग तुम्हाला See all  असे निवडायचे आहे. इकडे तुम्हाला जिकडून तिकडून Facebook लॉगइन केलेले होते किंवा आहे त्या सर्व डिवाइसेस ची लिस्ट सापडेल. मग आता ज्या डिवाईसेसमधून तुम्हाला अकाउंट लॉगआउट करायचे आहे ते निवडून तीन डॉट्स वर टैप करायचे आहे येथे तुम्हाला Log out वरती टैप करायचे आहे. आणि जर तुम्हाला सगळ्या डिवाईसेस, सर्व ठिकाणांहून Log out करायचे असेल तर Log out of all sessions हा पर्याय निवडावा.

डेस्कटॉप वरती करा अशा पद्धतीचे सेटिंग्स

हे करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला  डेस्कटॉप वर Facebook लॉगइन करणे जरुरी आहे. त्यानंतर सेटिंग्स  मध्ये जावे. तिकडे तुम्ही Security and login वर क्लिक  करा इकडे सुद्धा तुम्हाला Where you're logged in हा विकल्प दिसेल तिकडे तुम्हाला सर्व डिवाईसेस दिसतील जिकडून तुमचे आईडी लॉगइन झालेले होते किंवा आहे. आता जिकडून तुम्हाला अकाउंट लॉगआउट करून ठेवायचे ते इथूनच करू शकता तसेच Log out of all sessions हा पर्याय वापरुन सगळ्याच डिवाइसेस वरुन तुम्ही एकत्रितपणे लॉगआउट करुन बाहेर पडू शकता.  

Post a Comment

Previous Post Next Post