मोदी सरकारचा मोठा निर्णय , कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत...

नवी दिल्ली - . करोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू होईल त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

भारतासह जगभरात करोना व्हायरसने खळबळ आणि दहशत माजवली आहे. आत्तापर्यंत भारतात करोनाची लागण झाल्याने दोघांचा बळी गेला आहे. याचसंदर्भात आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.

करोनाची लागण झाल्याने आधी कर्नाटकात एका वृद्ध रुग्णाचा आणि काल दिल्लीत एका महिलेचा असे दोन मृत्यू झाले. काल ज्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच अमेरिका, जपान आणि इटलीला जाऊन आला होता. आता मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची  मदत केंद्राने जाहीर केली आहे. करोना ने जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे मोदी सरकारने करोना हे राष्ट्रीय संकट घोषित केलं आहे.


कोरोना व्हायसरचा पाय पसरायला हळूहळू सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबत चिंतामुक्त असलेल्या भारतीयांची चिंता आता वाढला आहे. देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 26 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर केरळमध्ये 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.


महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या 26 वर गेली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण आढळले आहेत.


नव्या आकडेवारीनुसार एकूण 94 रुग्ण देशभरात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र 26, केरळ 19, हरियाणा 14 (सर्व परदेशी नागरिक), उत्तर प्रदेश 12, दिल्ली 7, कर्नाटक 6, राजस्थान 3, पंजाब 1, जम्मू काश्मीर 1, लडाख 3, तामिळनाडू 1, तेलंगणा 1 यांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने