मुंबई : केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार व राज्याचा माजी आरोग्य मंत्री स्व.विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा ह्या आठ महिन्याच्या गर्भवती असून देखील त्या सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनच्या कामकाजात सहभागी होत आहेत व आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडत आहेत. विशेष म्हणजे नमिता मुंदडा ह्या पहिल्याच महिला आमदार आहेत. ज्या गरोदर असताना देखील विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होत आहेत.
मुंदडा यांच्या प्रसूतीची तारीख आता अगदीच जवळ आहे मात्र त्या आधीचे हे अधिवेशन महत्वाचे असल्याने या अवस्थेत सुद्धा त्या कामात सहभाग घेत आहेत. हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे आपण उपस्थित होणे आवश्यक आहे.असे मुंदडा यांनी एका मराठी वृतवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
विधानसभा सभागृहात अनेक महिला आमदार आपली काळजी घेतात.सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यामध्ये मला सहभागी होऊ देत नाहीत.असेही,नमिता मुंदडा यांनी बोलतांना सांगितले.त्यामुळे,विधीमंडळ अधिवेशनात नमिता मुंदडा या चर्चेचा विषय झाल्या आहेत तसेच त्यांचे सर्वच पातळीवरून कौतुक होत आहे
टिप्पणी पोस्ट करा