मुकेश अंबानींच्या घरातील कचऱ्यापासून केली जाते वीजनिर्मीती !


काही दिवसांपूर्वी एक बातमी व्हायरल झाली होती, ज्यात मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचे वेतन जाहीर झाले होते. पण यावेळी मुकेश अंबानींचे घर एन्टीलियाची बातमी आम्ही आणली आहे आणि बातमी आहे त्यांच्या घरातील कचऱ्याची.

मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा अजिबात बाहेर फेकला जात नाही तर तो घरच्या घरीच साठवून ठेवला जातो आणि त्याचा वीज उपयोग निर्मितीसाठी केला जातो असे सांगण्यात आले आहे.

मुकेश अंबानींच्या घराचे नाव भारतातील सर्वात मोठे घर म्हणून घेतले जाते. २७ मजली घराची देखभाल करण्यासाठी घरात ६०० कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून घरातील प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली जाते. केवळ या नोकरांच्या हातात सर्व काही व्यवस्थित करण्याच्या जबाबदारी आहे.

 सोशल मीडियात त्याच्या घरातील कचऱ्याबद्दल सध्या चर्चा होत आहे. असे सांगितले जाते की त्यांच्या घरातील कचऱ्याचा पुनर्वापर जातो ? आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्या घरातील विजेची निर्मिती कच-यामधूनच केली जाते ज्याचा उपयोग फक्त त्यांच्या घरातच केला जातो.

एका विशेष यंत्रणेद्वारे कच-यापासून त्यांच्या घरात वीज निर्मिती केली जाते. प्रथम ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. ज्यानंतर त्यातून वीज निर्मिती केली जाते. अशा मोठ्या घरात सर्वात जास्त वीज वापरली जाते.ज्यासाठी कचऱ्यासारखी गोष्ट वापरली गेली आहे हे विशेष.

Post a Comment

Previous Post Next Post