कोरोनाग्रस्तांची संख्या 5 कोटींच्याही पार
नवी दिल्ली - जगभरातील सर्वच देशांत तसेच महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतही कोरोनाचा वाढता हाहा:कार दिसून येतोय. कोरोनावर मात करण्यासाठी काही देशांत तर पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल 50,815,027 आकड्याच्याही वर पोहोचलेली आहे, आत्तापर्यंत कोरोनामुळे 12,63111 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. एकूणातच कोरोना या एका छोट्याशा विषाणुने जगातील लहान - मोठे सर्वच देश हतबल होऊ लागलेत. 


कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते कारण अजूनही अनेक देशांत कोरोना टेस्टिंग किट्सची पुरेशी उपलब्धता नाही. युरोपीय देशांत पुन्हा एकदा कोरोनाचा जोमाने फैलाव होत असून युरोप कोरोनाचा हॉटस्पोट बनलेला आहे. युरोपात कोरोनाची लागण झालेले एक करोडाहून अधिक संख्या असून 305700 एवढी कोरोनामुळे मृत पावलेल्याची संख्या आहे. दरम्यान आत्तापर्यंत अधिकाधिक कोरोनाच्या केसेस ह्या अमेरिकेत आढळून आलेल्या आहेत. कारण मागील काही आठवड्यांपासून अमेरिकेत रोजच्या रोजच कोरोनाच्या नवीन रूग्णांची वाढ भयंकर झपाट्याने झालेली दिसत आहे. 


स्मार्टफोनमधील एपच्याद्वारे एखादी व्यक्ती कोरोनाने बाधित आहे की नाही ते कळू शकणार आहे. याशिवाय लक्षणे नसलेली व्यक्तीदेखील ओळखता येणार असल्याचा दावा अमेरिकेतील Massachusett Institute of Technology ने केलेला आहे. कारण कोरोनाची चाचणी केल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने रुग्णाचा रिपोर्ट समज असतो परंतु या एपमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स मॉडेल तयार करून रुग्णांना लागलीच रिपोर्ट मिळू शकणार आहे. 

 

देशातही कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले आहे त्यातच एक सकारात्मक म्हणजे टाटा मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर कडून कोरोनाचे टेस्टींग किट बाजारात येऊ घातले आहे जे डिसेंबर महिन्यापासून देशभरातील सर्व लॅबला उपलब्ध होणार आहे. पूर्णपणे भारतात तयार होणारे किटची निर्मीती चेन्नईतील कारखान्यात महिन्याला 10 लाखांवर होणार आहे. टाटाचे हे कोरोनाचे स्वदेशी किट सध्या वापरात असलेल्या चिनी टेस्टिंग किटपेक्षा स्वस्त असून अधिक परिणामकारक असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे. Post a Comment

Previous Post Next Post