अयोध्या - महंत गोपालदास यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने प्रकृती अचानक बिघडली आणि त्यामुळे त्यांना एमब्युलन्समधून लखनऊच्या एका इस्पितळात दाखल केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला होता तेव्हापासूनच त्यांच्यावर गुरूग्राम येथील मेदांचा हॉस्पिटलवर उपचार करण्यात आले होते व त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते.
महंत गोपालदास हे केवळ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष असून ते कृष्णजन्मभूमी न्यासाचे अध्यक्षपदही भूषवणारे आहेत. दरवर्षी मथुरेत होणाऱ्या कृष्णजन्माष्टमीच्या उत्सवात ते महभागी होत असतात. सध्या ते 82 वर्षाचे असून त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी संन्यास घेतला आणि अयोध्येत आले. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून साधूंमध्ये जेव्हा वादंग निर्माण झाला होता तेव्हाच अध्यक्षपदही महंत गोपालदास यांची नियुक्ती करण्यात आणि अखेर वादावर पडदा पडला होता.
नुकतीच राममंदिराच्या निर्णयाला वर्षपूर्ती होत आहे त्यानिमित्ताने अयोध्येत रामजन्मभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त केला आहे. मागील वर्षी 9 नोव्हेंबरलाच सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील राममंदिरावर निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णयाच्या वर्षपूर्तीचा आनंद सोहळा साजरा करण्यासही केंद्र सरकारने निर्बंध घातलेले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा