विस्कळीत अर्थव्यवस्थेतही शेअर बाजारातील चढत्या आलेखामागील ५ कारणे

 



कोरोना विषाणूच्या भयंकर साथीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या भावनांवर प्रचंड परिणाम झाला. २३ मार्च २०२० रोजी तर बीएसई सेन्सेक्स २५,९८१ अंकांपर्यंत गडगडला होता. अशा संतप्त, भयग्रस्त आणि अस्थिर भावनांमागेही काही कारणे होती. आर्थिक आणि शारीरिक कामकाज ठप्प झाल्याने उद्योग व व्यवसाय क्षेत्रातही स्तब्धता आली होती.


शेअरचे मूल्य हे भविष्यातील उत्पन्न वृद्धीचे संकेत असतात. विषाणूमुळे आर्थिक कामकाज मंदावल्याने भविष्यातील उत्पन्नाच्या अपेक्षेत तीव्र घसरण झाली. त्यामुळे उत्पन्न आणि मूल्यांकनातील अंदाजावरही परिणाम झाला. तथापि, बाजाराने त्वरीत सुधारणा केली व तेव्हापासून परिस्थितीमध्ये जवळपास ७० टक्के सकारात्मक बदल दिसून आले. भारतीय शेअर बाजार हा जगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा बाजार ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टी ५०ने कोव्हिडच्या घसरणीनंतर जवळपास ७० टक्के सुधारण केली. सध्या हे दोघेही कोव्हिड पूर्वस्थितीच्या पातळीवर आहेत. बाजाराला यशस्वीतेच्या मार्गावर नेणारे काही प्रमुख ट्रेंड्सबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट-डीव्हीपी श्री ज्योती रॉय.


मध्यवर्ती बँकांमुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक तरलता: मार्च आणि एप्रिल महिन्यात तीव्र मंदी आल्याने सरकार आणि मध्यवर्ती बँकांनी जागतिक पातळीवर चलन व वित्तीय प्रोत्साहन पॅकेजेस जाहीर केले. जागतिक आर्थिक मंदी शिखरावर असताना केलेल्या उपाययोजनांपेक्षा हे उपाय अधिक प्रभावी आहेत. अमेरिकेने जवळपास वित्तीय प्रोत्साहनासाठी उपाययोजना म्हणून २.७ ट्रिलियन डॉलरची घोषणा केली. तर यूएस फेडरल रिझर्व्हने ३ ट्रिलियन लिक्विडिटीची मदत बाँड खरेदी प्रोग्रामद्वारे केली. अमेरिकेत दुसऱ्या प्रोत्साहनपर पॅकेजचीही चर्चा आहे तर फेडरल रिझर्व्हने आणखी मदतीची तयारी दर्शवली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेदेखील २०२० मधील दुस-या व तिस-या तिमाहीत ११५ बेसिस पॉइंट्सनी व्याजदरात कपात केली. ओपन मार्केट ऑपरेशन, लाँग टर्म रेपो ऑक्शन्स तसेच टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन्स यासारखे पारंपरिक उपायदेखील योजले.



एफआयआयचा दमदार पाठिंबा: भारतातील फॉरेन पोर्टफोलिओ इव्हेस्टमेंट (एफपीआय) ने मार्च महिन्यात ६१,९७३ कोटी रुपयांचा बाह्य प्रवाह अनुभवला. मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री झाल्यानंतर जागतिक तरलता आणि आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने शेअर बाजारात वृद्धी झाली व एफपीआयने पुढील महिन्यात प्रगतीचा आलेख दर्शवला. आर्थिक वर्षातील आतापर्यंतचा एकूण एफआयआयचा प्रवाह १,५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


हळू हळू अनलॉक झाल्याने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना: साथीभोवतीची अनिश्चितता आणि त्यासोबत आर्थिक नुकसानामुळे बाजारात तीव्र अस्थिरता होती. मात्र जागतिक पातळीवर आर्थिक कामकाज हळू हळू सुरु होत असल्याने कमी वेगाने मात्र विस्कळीत अर्थव्यवस्थेत सातत्याने प्रगती सुरू झाली. मार्च महिन्यात तळ गाठल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेने लक्षणीय वृद्धी केली. अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनसारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांसह सप्टेंबर महिन्यात रिटेल विक्री व पीएमआय नंबर्स रिटेल विक्रीत कोव्हिड-पूर्व पातळीएवढी महत्त्वपूर्ण सुधारणा झाली.


याचप्रमाणे, पीएमआयची संख्या ही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा होत असल्याचे संकेत दर्शवते. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत अर्थव्यवस्थेतही सुधारणा होत गेली आणि ऑटो विक्री तसेच पीएमआय क्रमांकातील हाय फ्रिक्वेन्सी डाटामध्ये दिसून आली. सप्टेंबरमधील उत्पादन पीएमआयमध्ये मोठी सुधारणा दिसून आली. सप्टेंबरमध्ये हा आकडा ५६.८ होता तर ऑक्टोबर महिन्यात तो ५८.९ दिसून आला. २००८ च्या मध्यापासूनचा हा सर्वोच्च रिडींग इंडिकेटर ठरला. याचप्रमाणे, सेवा क्षेत्रातील पीएमआयदेखील सप्टेंबरमधील ४९.८ वरून मोठ्या फरकाने वाढला. ऑक्टोबर महिन्यात तो ५४.१ वर होता. मार्चनंतर पहिल्या रिडिंगमध्ये तो ५० च्या पुढे होता. यावरून सेवा क्षेत्रातही मजबूत सुधारणा दिसून येते.


देशांतर्गत संस्थागत गुंतवणूक: देशांतर्गत संस्थागत गुंतवणुकीनेही साथीच्या काळातही उत्कृष्ट कल अनुभवला. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूक (डीआयआय) ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात २०,५०० कोटी रुपये झाली.


गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एनआयआय) सहभागात वृद्धी: शेअर बाजार डाटा निर्देशांकाने गैर संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या सहभागातही प्रचंड वृद्धी दर्शवली. ऑगस्ट २००९ नंतर ती सर्वाधिक दिसून आली. वित्तवर्ष २०२० मधील एनआयआयचा वाटा ५० टक्के दिसून आला. मागील तीन महिन्यातील ६८ टक्क्यांची ही मोठी झेप ठरली. एनआयआयने बाजारातील वाट्यात देशांतर्गत संस्थागत गुंतवणूक व विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनाही मागे टाकले, तेव्हा ती लक्षणीय प्रगती ठरली. किरकोळ गुंतवणूकदार आणि शेअर बाजारासाठी ही सर्वात चांगली बातमी आहे.


अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्येही शेअर बाजारात वृद्धी झाली. कारण आता अमेरिकेच्या दुस-या प्रोत्साहन विधेयकाकडे सर्वांचे लक्ष होते. हे विधेयक अमेरिकी सरकारच्या अजेंड्यावर होते. त्यातच, फायजर, मॉडर्ना आणि अॅस्ट्रा झेनेका या कंपन्यांनी कोव्हिडविरोधात त्यांनी बनवलेली लस प्रभावी ठरत असल्याची बातमी दिली. २०२० या वर्षाच्या अखेरीस आरोग्य संस्थांकडून लसींना तातडीची मान्यता मिळेल आणि २०२१ च्या पहिल्या तिमाहीत लसीचे वितरण सुरू होईल, अशी बाजाराला अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणावत तरलता, कोव्हिडच्या मंदीनंतर मजबूत आर्थिक सुधारणा यासह लसीची सकारात्मक बातमी यामुळे शेअर बाजारात वृद्धीचा आलेख दिसून येत आहे.  

1 Comments

  1. Play Coin Casino Online - Casinowoworld
    Play Coin Casino Online, 인카지노 a great online casino for real money with Free Spins, No Download needed kadangpintar & 100% safe! Play 바카라 Now!

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post