शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड


प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईकला घेतले ताब्यात 




मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे.  यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. 


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. 


प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी पोहोचत ईडीने धाडी टाकल्या आहेत. यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. 



अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.


कोण  काय म्हणाले ? 

  • प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत - नारायण राणे 


  • एक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती - प्रवीण दरेकर 

  • काहीही करा, पुढची 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही! याद राखा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही - संजय राउत


  • काही पुरावे असतील म्हणूनच ईडीने सरनाईकांवर कारवाई करत छाड टाकली आहे. 'ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीकडून कारवाई करण्यात आली असेल. ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही' - देवेंद्र फडणवीस 


  • शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेत आहेत - किरीट सोमय्यां

Post a Comment

Previous Post Next Post