सोने दरात १.२ टक्क्यांची घसरण





मुंबई - जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाल्याने तसेच कोव्हिडमुळे लॉकडाऊन असल्याने सोने आणि कच्च्या तेलाची मागणी घटली. मागील आठवड्यात अमेरिकेच्या डॉलरमूल्यात वाढ झाल्याने स्पॉट गोल्डचे दर १.२ टक्क्यांनी घसरले तसेच अमेरिकेकडून कोरोना निधीची कोंडी झाल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याच्या मागणीवरही परिणाम झाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकेच्या मदतनिधी करारातील अपयशी प्रयत्नांनंतर, अमेरिकी प्रशासनाने आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपर्यंत निधीचा प्रस्ताव पुढे ढकलला. कमकुवत कामगार बाजार असूनही, अमेरिकेची अर्थव्यवस्था २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत वेगाने सुधारली. त्यामुळे पिवळ्या धातूच्या किंमतीवर दबाव आला. तथापि, कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाल्याने जागतिक अर्थकारणावर दबाव येऊन सोन्याच्या नुकसानीला मर्यादा आल्या. बहुतांश देशांनी नव्याने लॉकडाऊन लावल्याने बाजाराच्या जोखीमेवर परिणाम होऊन गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल: मागील आठवड्यात, साथीचा विस्तार आणि लिबियन तेल उत्पादनात सुधारणा झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १० टक्क्यांनी कमी झाले. अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या वाढवत असल्याने दरात घसरण सुरू झाली. विषाणूमुळे कठोर निर्बंधांची ततसेच जागतिक आर्थिक सुधारणेत पुनन्हा मंदी येण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने नोंदवले की, अमेरिकेच्या क्रूडसाठ्यात ४.३ दशलक्ष बॅरलने वाढ झाली. यामुळेही तेलातील नुकसान वाढले. मागील आठवड्यात तेल उत्पादन वाढल्याने साठ्यातही उच्चांक गाठला गेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने