ऐनवेळी ब्रेक्झिट करार होण्याची शक्यता अजूनही आहे?


दरांतील चढ-उतार


ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून GBPUSD मध्ये टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, तसेच युरोप आणि ब्रिटनदरम्यान वाढेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर GBPINR प्रमाण १.७ टक्क्यांनी घसरले. दरम्यान या कालावधीत सुरक्षित डॉलर निर्देशांक ०.८३ टक्क्यांनी घसरला  व पाऊंडला आणखी आधार मिळाला.


दुसऱ्या भयंकर लाटेचा ब्रिटनला विळखा


कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने ब्रिटनला पूर्णपणे विळखा घातला आहे. मागील आठवड्यात  दररोज २०,००० रुग्णांची नोंद होत होती. देशातील एकूण संसर्गग्रस्तांची संख्या ८९,४६९० आणि मृत्यूंची संख्या ४४,९९८ वर पोहोचली.


कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने इंग्लंडमधील प्रमुख भागांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे.


लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अमेरिकीची अर्थव्यवस्था २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत २०.४ टक्क्यांनी घटली. सेवा, बांधकाम आणि  उत्पादन क्षेत्रातील जीडीपीतील घट ही प्रामुख्याने या घसरणीकरिता कारणीभूत ठरली.


ब्रिटनच्या जीडीपीतील घट ही तर समतुल्य विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वाधिक होती. अर्थव्यवस्थेतील घसरणीमुळे  हिवाळ्यातील  नोकरीच्या चिंतेने बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या महिना अखेरीस  ब्रिटिश सरकारने वेतनास आधार दिल्याने तसेच कोरोना विषाणच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी नवे निर्बंध घातले गेल्याने बेरोजगारीचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.


ब्रेक्झिटचे रहस्य उलगडेल?


ब्रिटन आणि युरोपने २२ ऑक्टोबर रोजी ब्रेक्झिटनंतरच्या वाटाघाटीस सुरुवात केली. करारासंबंधी दोन्ही पक्षांदरम्यानची थांबलेली चर्चा निश्चित बिंदूपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. मासेमारीच्या हक्काबाबत दोन्ही पक्ष ठाम आहेत. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्त्यांनी मान्य केले की, ब्रिटन आणि युरोपियन युनियनदरम्यानचे मतभेद कमी करण्याकरिता अडचणीच्या ठरणाऱ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी  ब्रेक्झिट करारानंतर फारच कमी वेळ शिल्लक आहे. महत्त्वाच्या बाबींवर बरीचे कामे खूप कमी कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी कबूल केले.


अँड्रयू बेली यांच्याकडून सतत नकारात्मक व्याजदराचे संकेत


बीओईचे गव्हर्नर यांनी  बँकांना शून्य किंवा निगेटिव्ह व्याजदराची तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  बँकांची प्रतिक्रिया कळवण्यासाठी  पुढील पतधोरण बैठकीच्या एक आठवड्यानंतची म्हणजेच  १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत बीओईने दिली आहे.


नोव्हेंबरमध्ये धोरणकर्ते आपला बाँड बायबॅक प्रोग्राम वाढवतील, अशी अपेक्षा आहे. संकटापूर्वीपेक्षा अर्थव्यवस्था ७ ते १० टक्क्यांनी घटलेली आहे, अशी माहिती गव्हर्नर यांनी दिली.


आऊटलूक


ब्रेक्झिटनंतरच्या वाटाघाटी आणि कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ यामुळे पाऊंडवर चढ-उतारावर अधिक परिणाम होत आहे.  दोन्ही पक्षांमध्ये बाजाराला ऐनवेळी होणाऱ्या कराराची अपेक्षा आहे, मात्र चर्चेचा तराजू दोन्हीही बाजूला स्थिरावू शकतो. युरोपियन युनियन आणि ब्रिटन दरम्यान ब्रेक्झिटच्या चर्चेत मासेमारी आणि काही महत्त्वाचे व्यापारी मुद्दे अजून अनिर्णित आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मते, प्रमुख मुद्द्यांवर काम करणे आवश्यक असून हा करार अद्याप कागदोपत्रीच आहे.


विषाणूच्या नकारात्मक परिणामांविरुद्ध लढण्यास मदत करण्यासाठी केंद्रिय बँका अर्थव्यवस्थांना अनुकूल अशी भूमिका घेत आहेत. यामुळेच जगातील प्रमुख मध्यवर्ती बँका तसेच बीओई ही ५ नोव्हेंबर रोजीच्या पुढील बैठकीत तिचा बायबॅक प्रोग्राम १०० अब्ज पाऊंडांनी वाढवण्याची अपेक्षा आहे. या वाढीनंतर एकत्रित बाँड बायबॅक प्रोग्राम ८४५ अब्ज पाऊंडांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


म्हणूनच, व्यापारी करारानंतरची शक्यता लक्षात घेऊन तसेच बाँड बायबॅक प्रोग्राममधील वाढ ही पाऊंडमधील वृद्धीस अधिक बळकटी देईल, अशी आशा आहे.


एकूणच, GBPINR Spot (CMP: 96) हा नोव्हेंबर २०२० च्या अखेरीस ९७ पर्यंतची वाढीव पातळी गाठू शकतो.


( श्री. वकारजावेद खान, रिसर्च अॅनलिस्ट, एंजेल ब्रोकिंग लि.)

Post a Comment

Previous Post Next Post