सोने की चांदी: गुंतवणूक करताना या गोष्टींकडे द्या लक्ष



बाजारात अस्थिरता असताना इतर गुंतवणूक पोर्टफोलिओच्या तुलनेत गुंतवणूकदार सामान्यपणे इतर मालमत्तेकडे वळतात. त्यात सोन्याचा समावेश होतो. संकटकाळात किंवा आर्थिक मंदीत चांदी हा देखील सुरक्षित पर्याय समजला जात असला तरी सोन्यालाच पसंती दिली जाते. सध्याच्या साथजन्य परिस्थितीत अमेरिकी डॉलरचे मूल्यही घसरत आहे.

चांदीची मागणी वाढण्यामागेही हीच कारणे आहेत. अनुकूल स्थितीतही सोने आणि चांदीची चमक कमी होत नाही, असे म्हणतात. पोर्टफोलिओत वैविध्याच्या धोरणाचा भाग म्हणून अनेक गुंतवणूकदार त्यांच्या मालमत्तेचा ठराविक भाग चसोने किंवा चांदीच्या मालमत्तेसाठी वेगळा ठेवतात. अर्थात, त्यात अनेक समानता आणि काही विषमताही दडलेल्या आहेत. याबद्दल अधिक माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या.

१. पुरवठ्यातील टंचाईमुळे सोने हे चांदीपेक्षा महाग असते: किंमतीच्या बाबतीत सोन-चांदीचे गुणोत्तर विरोधात्मक आहे. एक औंस सोने खरेदीच्या तुलनेत आपल्याला कित्येक औंस चांदी खरेदी करावी लागते. सप्टेंबर २०२० च्या पहिल्या तिमाहीपर्यंत सोने विरुद्ध चांदीचा किंमतीचे गुणोत्तर जवळपास ७२:१ एवढे होते. यावरून असे दिसते की, दर एक औस चांदीच्या तुलनेत सोने हे ७० पटींनी मौल्यवान आहे. किंमतीतील या असमानतेपलिकडे बोलायचे झाल्यास अगदी मार्च महिन्यातही सोने-चांदीचे गुणोत्तर खूप नाट्यमय होते. १२०:१ असे हे ऐतिहासिक प्रमाण नोंदवले गेले. या असमानतेच्या दृष्टीकोनातून पाहिले तर २१ व्या शतकात हे प्रमाण सरासरी ६०:१ असे नोंदवले गेले.

चांदीची कामगिरी उत्तम असली तरीही ती सोन्याच्या मूल्यापर्यंत पोहोचत नाही. दोन्हीपैकी सोने हा दुर्मिळ धातू आहे. परिणामी त्याचे मूल्य जास्त आहे. २०१९ मध्ये जगातिक सोन्याच्या खाणीतून निघणा-या सोन्यात घसरण झाल्याचे तज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे पुरवठ्यातील टंचाई हा त्याचाच पुरावा आहे. चांदीच्या २७,००० टनांच्या तुलनेत हे अगदी ३,३०० टनांपर्यंत मर्यादित राहिले.

२. चांदीपेक्षा सोने कमी अस्थिर असते: अल्पकालीन चढ-उतार असल्याने गुंतवणूकदारांना चालना मिळते, तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिले जाते. १९८९ ते २०१९ या ३० वर्षांच्या कालावधीत सोन्याची वार्षिक अस्थिरता पाहिल्यास, ती एसअँडपी ५०० निर्देशांकापेक्षाच्या तुलनेत सोने १५.४४% आणि एसअँडपी ५००चे प्रमाण १४.३२% एवढे नोंदवले गेले. तर दुसरीकडे, चांदीतील अस्थिरता यापेक्षा जवळपास दुप्पट असते. तसेच, सोन्याच्या बाजाराच्या तुलनेत चांदीच्या बाजाराची उलाढाल प्रामुख्याने कमी असते. सोन्याच्या बाजारातील उलाढाल २४.५ ट्रिलियन डॉलर आहे तर चांदीची ४.४ ट्रिलियन डॉलर एवढी आहे. मात्र किंमत कमी होण्याच्या लाटेत या दोहोंवर समान परिणाम दिसून येतात. उपरोक्त वक्तव्यानुसार, सोन्याच्या बाजारापैकी एका भागाच्या मूल्याची तुलना एकूण चांदीच्या बाजारमुल्याशी करता येते. अल्प मुदतीच्या चढ-उतारांच्या एकाच पैलूनुसार चांदी ही सोन्यापेक्षा जास्त आकर्षक ठरते. तथापि, तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीत रस असेल तर सोने हे अधिक आकर्षक ठरू शकते.

३. वैविध्याच्या दृष्टीकोनातून गुणवैशिष्ट्ये: आपल्या पोर्टफोलिओत मौल्यवान धातूचा समावेश करणे, ही गुंतवणुकदारांची सामान्य वृत्ती आहे. इतर स्टॉक्स किंवा बाँड्सप्रमाणे या मौल्यवान धातूंची किंमत परस्परांवर अवलंबून नाही. त्यामुळे एकूणच पोर्टफोलिओतील जोखीम कमी होते. यामुळे गुंतवणुकीचे पर्याय वाढतात व सोन्या-चांदीकडे गुंतवणुकदार आकर्षित होतात. तथापि, वैविध्याचा विचार येतो, तेव्हा सोने हे दोन्ही धातूंमध्ये महत्त्वाचे मानले जाते. उदाहरणार्थ, अमेरिकी डॉलरसह इतर चलन ठेवण्याच्या जोखिमीसंबंधी वैविध्यतेसाठी मध्यवर्ती बँका चांदीऐवजी सोन्याची खरेदी करतात.

४. वैयक्तिक प्रस्तावांबाबतीत तुलना: औद्योगिक वापरासाठी सोन्याच्या तुलनेत चांदीचा जास्त वापर होतो. या गरजेमुळे चांदी ‘हाय डिमांड कमोडिटी’ ठरते. चांदीत परावर्तन, औष्णिक आणि इलेट्रॉनिक दृष्टीने अनुकुल असे गुणधर्म आहेत. मागील दोन दशकांत, सोन्यापेक्षा चांदीसाठी अधिक पेटंट्स दिसून आले. तथापि, मागील दहा वर्षांत ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये १ अब्ज औंस चांदीचा वापर करण्यात आला. या एका पैलूवर चांदीने सोन्यापेक्षा जास्त चमक प्राप्त केली. त्यामुळे पुढील वर्षांत चांदीचे दर वाढतील, अशी अपेक्षा करणे तर्कसंगत आहे.

अंतिम टीप: जे लोक मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे नियोजन करतात, त्यांच्यासाठी सध्याच्या घडीला सोने आणि चांदी या दोन प्रमुख पसंत आहेत. तसेच भारतीय दागिन्यांच्या वापरासाठी सोन्याचा वापर करतात तसेच गुंतवणुकदारांसाठी ती सहज उपलब्ध असलेली वस्तू आहे. कारण यात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल सोन्याचा पर्याय आल्यामुळे गुंतवणुकादारांमध्ये तो अधिक लोकप्रिय झाला. डिजिटल गोल्डमुळे कमोडिटी गुंतवणूक अधिक किफायतशीर केली तसेच, उच्च साठवण खर्चाची चिंता दूर केली. सोन्याची मालमत्ता आता एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि ई-गोल्डच्या स्वरुपातही खरेदी करता येऊ शकते. एक्सचेंज ट्रेडेड फंड हे डिमॅट अकाउंटमधूनही ऑपरेट करता येतात. याद्वारे डिजिटल फॉर्ममधील सहज ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळते. यासोबतच, ई-वॉलेट्स आणि पेमेंट गेटवेदेखील बदलत्या प्रमाणानुसार व्यापाराचे पर्याय दिले जात आहेत. ज्यामुळे सध्याच्या संकटकाळात प्रत्यक्ष सोने मिळवणे कठीण झाले असताना स्मार्टफोन आधारित व्यवहार आणि रिवॉर्ड्स मिळू शकतात. 

या फरकांमुळे गुंतवणूकदारांना त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे सोपे जाईल. वरील फरक स्पष्ट केल्यावर जाणीवपूर्वक निर्णय घेणे म्हणजे रिटर्नची जास्तीत जास्त संधी साधणे होय.

Post a Comment

Previous Post Next Post