पुण्यात दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीपुणे - शिवाजीनगर पोलीस  मुख्यालयात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने पुण्यातील पोलीस दलात चर्चेचा  विषय झाला आहे.


सायबर पोलीस ठाण्यातील हाणामारीचा प्रकार ताजा असतानाच, सोमवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस  मुख्यालयात  दोन महिला पोलिसांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या दोन्ही महिला पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. एल महिला पोलीस नाईक आणि दुसरी पोलीस शिपाई आहे. सोमवारी सकाळी या दोन महिला पोलिसांमध्ये ड्युटीच्या कारणांवरून शाब्दिक बाचाबाची होवून नंतर शिवीगाळ आणि त्याचे पर्यवसन फ्री स्टाईल हाणामारीमध्ये झाले.  यावेळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. 


 या हाणामारीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी  गांभीर्याने दखल घेतली असून, या हाणामारी प्रकरणी काय कारवाई  होणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post