एव्ही ऑरगॅनिक्सने 'इव्होकस एच२ओ' लॉन्च केले

~ भारतातील पहिले नैसर्गिक ब्लॅक अल्कलाइन पाणी आता मुंबईकरांसाठी उपलब्ध ~




मुंबई, २७ सप्टेंबर २०२०: भारतातील पहिले भरपूर खनिजयुक्त, ब्लॅक अल्कलाइन वॉटर इव्होकस एच२ओचे निर्माते एव्ही ऑरगॅनिक्सने त्यांचे फ्लॅगशिप उत्पादन आता मुंबई शहरात लाँच केले आहे. प्रतिकारशक्ती आणि हायड्रेशनद्वारे डिटॉक्झिफिकेशन वाढवणारी आरोग्यावर आधारीत उत्पादने सादर करणे हे कंपनीचे उद्दिष्ट असून यासाठीच हे नवे उत्पादन लॉन्च कारणात आले आहे. वाढीव हायड्रेशन आणि डिटॉक्सिफिकेशनद्वारे सर्वांगिण निरोगीपणाचा हेतू असलेले हे क्रांतीकारी ब्लॅक वॉटर ५००मिली, २५०मिलीच्या पुनर्वापरायोग्य पीईटी व्हेरिएंट्समध्ये तसेच ३३०मिलीच्या काचेच्या बाटलीत उपलब्ध होईल.

इव्होकस एच२ओ हे मुंबईतील फुड हॉल, नेचर्स बास्केट, हायको यासारख्या आधुनिक ट्रेड आउटलेट्स, स्टँडअलोन सुपरमार्केट्स आणि हेल्थ अँड वेलनेस स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. ऑफलाइन सेल्स चॅनल्स वाढवत असतानाच एव्ही ऑरगॅनिक्स आता हे क्रांतिकारी पाणी ४ आणि ५ स्टार हॉटेल्स, उत्तम खाद्य पदार्थ देणारे फाइन-डाइन रेस्टॉरंट्स, कॅफे, क्यूएसआर, क्लाउड किचनमध्येही उपलब्ध करणार आहे. दरम्यान, ऑनलाइन विक्रीसाठी कंपनी अॅमेझॉन, हेल्थकार्ट आणि त्यांच्या प्रॉडक्ट ई-कॉमर्स वेबसाइटवरही ब्लॅक अल्कलाइन वॉटरची विक्री करत आहे.

एव्ही ऑरगॅनिक्सचे एमडी आणि सहसंस्थापक श्री आकाश वाघेला म्हणाले, "मुंबई ही महत्त्वाची बाजारपेठ असून, त्यामुळेच भारतातील इतर मेट्रो शहरांनंतर आम्ही येथे उत्पादन लाँच करण्याचे ठरवले. तसेच इथे असंख्य फिटनेस प्रशंसक, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि आरोग्याप्रती जागरूक लोक आहेत. मार्च२०२१ पर्यंत महत्त्वाच्या टीअर-१ आणि टीअर-२ ग्राहकांपर्यंत आमच्या उत्पादनाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट साधण्यात या लाँचिंगद्वारे मदत होईल.”

Post a Comment

Previous Post Next Post