निफ्टी ७७.३५ आणि सेन्सेक्स २३० अंकांनी वधारला
मुंबई, २६ ऑगस्ट २०२०: भारतीय निर्देशांकांनी आजच्या सत्रात उच्चांकी स्थिती गाठली. या नफ्याचे नेतृत्व वाहन क्षेत्राने केले. वाहन क्षेत्रासह बँक, ऊर्जा, धातू आणि आयटी स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी ०.६७% किंवा ७७.३५ अंकांनी वधारला व तो ११,५४९ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५९% किंवा २३०.०४ अंकांनी वाढून ३९,०७३.९२ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११०५ शेअर्स घसरले, १५२८ शेअर्सनी नफा कमावला तर १२४ शेअर्स स्थिर राहिले. टाटा मोटर्स (८.८९%), हिरो मोटोकॉर्प (६.४२%), इंडसइंड बँक (५.९६%), झी एंटरटेनमेंट (५.४०%) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (२.४८%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती एअरटेल (२.८७%), अल्ट्रा टेक सिमेंट (२.१७%), ब्रिटानिया इंडस्ट्रिज (१.६४%), एशियन पेंट्स (१.५१%) आणि मारुती सुझूकी (१.३१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांनी वृद्धी दर्शवली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.३८% आणि ०.६९% नी वधारले.
सीजी पॉवर अँड इंडस्ट्रिअल सोल्युशन्स लि.: आजच्या दिवसात सलग ९ व्यापारी सत्रात कंपनीच्या २.२९ कोटी शेअर्सची देवाणघेवाण झाल्याने कंपनीचे शेअर्स ४.८६% नी वाढले व त्यांनी १९.४० रुपयांवर व्यापार केला.
इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स लि.: कंपनीने पूर्वी दिलेल्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्ससाठी टाइमली पेमेंट ऑफ इंटरेस्ट घोषित केले. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ५.६७% वाढले व त्यांनी २१८.०० रुपयांवर व्यापार केला.
जेएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया)लि.: जेएमसी प्रोजेक्टने ५५४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. दक्षिण भारतातील बिल्डिंग प्रोजेक्टचा त्यात समावेश आहे. ही ऑर्डर एकूण ३१५ कोटी रुपयांची आहे. कंपनीला महाराष्ट्रातील २३९ कोटी रुपये किंमतीच्या कारखान्यांचा प्रकल्पही मिळाला. परिणामी, कंपनीचे स्टॉक्स १२.६४% नी वाढले व त्यांनी ६०.१५ रुपयांवर व्यापार केला.
टाटा मोटर्स: पुढील तीन वर्षात कंपनीचे ऑटोमोटिव्ह कर्ज शून्य पातळीवर कमी करण्याच्या टाटा मोटरच्या निर्णयाचे ट्रेडर्सनी स्वागत केले. कंपनीच्या शेअर्समध्ये ८.८९% नी वाढ झाली व त्यांनी १३८.४० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या सत्रात भारतीय रुपयाने फ्लॅट कामगिरी दर्शवत ७७४.३० रुपयांचे मूल्य अनुभवले.
जागतिक बाजार: चीन-अमेरिका व्यापारातील वाटाघाटीत प्रगती दिसून आल्याने बाजाराला उत्तेजन मिळाले. याचा परिणाम संमिश्र आशियाई बाजार संकेतात झाला. युरोपियन बाजार आजच्या सत्रात घसरलेला दिसला. नॅसडॅक ०.७६% नी वाढ घेतली तर निक्केई २२५ कंपनीच्या शेअर्सनी ०.०३% ची घसरण घेतली. हँगसेंगचे शेअर्स ०.०२% नी वाढले तर एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स अनुक्रमे ०.१७% आणि ०.०६% नी घसरले.
टिप्पणी पोस्ट करा