कोविड-१९ चा सामना करण्यासाठी मेसर टेक्नोलॉजीने अतुल्य स्टरलायझर केले लॉन्च


~ कोविड-१९ किंवा तत्सम विषाणू व जीवाणू नष्ट करते ~


~ केंद्रीयमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण ~
मुंबई, ११ ऑगस्ट २०२०: निर्जंतुकीकरणासाठी सुक्ष्मलहरींच्या तंत्रज्ञानावर काम करणा-या भारतातील एकमेव वैद्यकीय एमएसएमई मेसरने आज आपल्या अतुल्य या नवीन उत्पादनाच्या लाँचची घोषणा केली. कोविड-१९ साथीच्या काळात पृष्ठभाग, भवताल आणि एअरोसोल्सचे निर्जंतुकीकरण करणे अतुल्यच्या मदतीने शक्य होणार आहे. हे उत्पादन केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. यावेळी खासदार तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे, नागपूरच्या बीजेवायएमच्या अध्यक्ष श्रीमती शिवानी दाणी वाखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेच्या डीआरडीओ अभिमत विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर अतुल्य आधारित आहे. हा स्टरलायझर म्हणजे हातात धरून वापरण्याचे उपकरण आहे आणि वस्तू, पृष्ठभाग, भवताल व एअरोसोल यांचे, आकार व आकारमानानुसार, ३० सेकंद ते १ मिनिट एवढ्या काळात निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता या उपकरणात आहे. यामध्ये पेटंटयुक्त स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे ५६-६० सेल्सिअस तापमानाच्या कक्षेत शीत निर्जंतुकीकरण केले जाते (MACS R ). उत्पादनाचे ४.५ किलोग्रॅम वजनाचे मॉडेल ५ अँपियरच्या कनेक्टेड वीजपुरवठ्यावर चालते. याच उत्पादनाचे पोर्टेबल बॅटरी व्हर्जन विकसित करण्यावर कंपनीचे काम सुरू आहे.
केंद्रीयमंत्री श्री. नितीन गडकरीजी म्हणाले, 'कोविड-१९चा सामना करत असताना, आपल्या भारतातील बुद्धिवंत तंत्रज्ञानासारख्या महत्त्वपूर्ण बाबीवर काम करत आहेत आणि अतुल्यसारखी उत्पादने विकसित करत आहेत हे बघणे अत्यंत आनंददायी आहे. भारतातील एमएसएमई प्रत्येक नवोन्मेषासोबत ‘व्होकल फॉर लोकल’ हा दृष्टिकोन कसा पुढे घेऊन जात आहेत यावर यातून प्रकाश टाकला गेला आहे. लोकांनी ही उत्पादने वापरून आपली सुरक्षितता निश्चित करावी असे आवाहन आम्ही करतो.'
मेसर टेक्नोलॉजीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मोनीष भंडारी म्हणाले 'मेसरमध्ये आम्ही कायम निर्जंतुकीकरण व प्रभावलोपन (स्टरलायझेशन) यांच्या माध्यमातून लोकांच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी काम करत असतो. या महत्त्वाकांक्षेतूनच आम्ही डीआयएटीसोबत (डीआरडीओ) करार केला आणि लोकांसाठी सुरक्षित भवताल निर्माण करण्याच्या उद्देशाने अतुल्य स्टरलायझर लाँच केला. या उत्पादनातील सुक्ष्मलहरींचे तंत्रज्ञान, या साथीच्या काळात, विषाणू नष्ट करण्यासाठी व भवताल सुरक्षित ठेवण्यासाठी, उपयुक्त आहे. अतुल्य स्टरलायझरने ३० सेकंद साधे स्कॅन केले तरीही ५ मीटर खोलीपर्यंतचा भाग स्टरलाइझ होतो आणि कोविड किंवा तत्सम विषाणू व जीवाणू नष्ट होतात.'

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने