“महिला सुरक्षेवर भाषण नकोत तर हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे कृतीतून दाखवा "


भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन



मुंबई  - गेल्या दहा दिवसांत राज्यात अल्पवयीन मुलीयुवतीवर अत्याचार होण्याच्या अनेक  घटना पाहिल्यावर महाआघाडी सरकार महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसते आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीचा दिशा कायदा अंमलात आणण्यात ठरलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे,  असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.

चित्रा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कीवर्धा येथे ७ वर्षांच्या आणि १२ वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाले. त्या आधी चंद्रपूर येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १६ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. रोहा येथे १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झालापुणे जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. या साऱ्या  घटना गेल्या दहा दिवसांत घडल्या आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तींना कायद्याचा आणि सरकारचा धाक उरलेला नाहीहेच या घटनांतून दिसून येत आहे. 

अनेक छोट्या मोठ्या बाबींवर विविध माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी व राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनांबद्दल चकार शब्दही उच्चारलेला नाही. यातूनच हे सरकार महिलांवरील अत्याचारासारख्या विषयात किती असंवेदनशील आहेहे दिसून येते आहे. दिशा कायदा लवकरच आणू असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने महिलाअल्पवयीन मुलींवरील अत्याचार हा महत्वाचा विषय राहिलेला नाही हेच दिसते आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षा विषयावर भाषणे देण्यापेक्षा कृती करण्याची आवश्यकता आहे असेही चित्रा वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने