चिनी अॅप्स बंदीनंतर लाइफस्टाइल कम्युनिटी कॉमर्स मंचाच्या लोकप्रियतेत वाढ


मुंबई, ६ जुलै २०२०: भारत सरकारने इतर ५८ चिनी अॅपसह टिकटॉक या लोकप्रिय अॅपवरही निर्बंध लादल्यानंतर भारतीय कंटेंट क्रिएटर्स ट्रेल या भारतातच विकसित झालेल्या अॅपकडे वळाले. प्लॅटफॉर्मवर त्यांना पूर्वीसारखीच शॉर्ट व्हिडिओ तयार करण्याची सुविधा मिळाली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचा प्रसार करण्यासाठी धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच या लाइफस्टाइल कम्युनिटी कॉमर्स प्लॅटफॉर्मने सर्व विक्रम मोडत १२ दशलक्ष डाउनलोड्स केवळ ५ दिवसात अनुभवले. फ्री लाइफस्टाइल अॅप्समध्ये #१ ट्रेंडिंग असलेल्या या प्लॅटफॉर्मन एकाच दिवसात ५ लाखांपेक्षा जास्त अपलोड्स आणि २ लाख २० हजारांपेक्षा जास्त नवे कंटेंट क्रिएटर्स मिळवले.
आरोग्य, फिटनेस, सौंदर्य आणि त्वचेची काळजी, पर्यटन, चित्रपट समीक्षण, पाककृती, गृहसजावट इत्यादी विषयांचे अनुभव, सूचना आणि विश्लेषणे शेअर करण्यासाठी ट्रेल हा अगदी सोपा प्लॅटफॉर्म असून यामुळेच तो ‘भारताचा व्हिडिओ पिनटरेस्ट’ म्हणून लोकप्रिय आहे. या लाइफस्टाइल व्ह्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यूझर्सना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये ३ ते ५ मिनिटांचे व्हिडिओ तयार करण्याची अनुमती असते. तसेच येथील ‘शॉप’ या फीचरवर व्ह्लॉग्समध्ये उल्लेख केलेली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासोबतच प्लॅटफॉर्मवर इंटरफेसद्वारे पुरस्कार, बक्षीसे मिळवण्याचीही संधी असते.
ट्रेलचे सह संस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले, “अशा प्रकारचे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल तसेच व्होकल फॉर लोकल या दृष्टीकोनातून भारतीय प्लॅटफॉर्म्सना संधी खुल्या केल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार मानतो. या नव्या संधीसोबत, भारतीय इंटरनेट स्टार्टअप्स आता वेगाने प्रगती करू शकतील. तसेच याआधीच्या स्थापित इतर कंपन्यांकडे असलेल्या ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देत त्यांच्याशी दीर्घकालीन नाते तयार करता येऊ शकते. या कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान/अल्गोरिदम्स, अनुभवी व्यवस्थापन समूह, तसेच भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक घेऊन आल्या होत्या. त्यामुळे भारतीय स्टार्टअप्सना आपले अस्तित्व टिकवणे कठीण होते. काही कंपन्यांनी तर भारतीय डिजिटल उत्पादनांना आव्हान देण्यासाठी त्यांची अगदी पिक्सेल-बाय-पिक्सेल नक्कल केलेली आपण पाहिली आहे. देशातील सर्वात मोठे लाइफ स्टाइल सोशल अॅप्लिकेशन या नात्याने आम्ही यूझर्सची गोपनीयता आणि डाटा सुरक्षित ठेवू आणि देशाने आखून दिलेल्या मर्यादेत राहू, याची खात्री देतो.”

2 Comments

 1. परंतु इंटरनेट च्या बाबतीत सरकारचे योग्य पाऊल दिसत नाही...
  इंटरनेट दर वाढवले गेले,इनकमिंग साठी सुध्दा मासिक भाडे सुरू केले त्यामुळे कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे.
  परिणामी एकच सिम कार्ड वापरणे पसंत केले गेले.तीन महिने कोणतेही रिचार्ज केला नसल्यास ते सिम कार्ड बंद पडते या सर्व अटी सिथिल करणे गरजेचे आहे.

  ReplyDelete
 2. परंतु इंटरनेट च्या बाबतीत सरकारचे योग्य पाऊल दिसत नाही...
  इंटरनेट दर वाढवले गेले,इनकमिंग साठी सुध्दा मासिक भाडे सुरू केले त्यामुळे कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे.
  परिणामी एकच सिम कार्ड वापरणे पसंत केले गेले.तीन महिने कोणतेही रिचार्ज केला नसल्यास ते सिम कार्ड बंद पडते या सर्व अटी सिथिल करणे गरजेचे आहे.

  ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post