सार्कच्या चर्चेत भाग न घेण्याची पीएम इम्रानची मोठी चूक

जगातील 145 हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत 5735 लोकांचा बळी घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत संपूर्ण जगात 153517 रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ चीनमध्ये,कोरोना बाधितांची संख्या 81048 आहे. चीनमध्ये आतापर्यंत 3204 लोक मरण पावले आहेत तर सार्क देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल आपण बोललो तर आतापर्यंत येथे एकूण 203 रुग्ण आढळले आहेत. यापैकी भारतात 107, पाकिस्तानमध्ये 52, अफगाणिस्तानात 16, मालदीवमधील 13, बांगलादेशात3, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालेली आहे. परंतु जिथे जगातील लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे, तर तिथे पसरलेला हा व्हायरस बर्‍याच लोकांना ठार मारू शकतो.

 आणि याचाच विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क देशांना एकत्र केले होते व कोरोनाशी सुरू असलेल्या लढ्याबाबत सर्व देशांच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा केली आणि त्याचे प्रतिबंधात्मक असे काय प्रयत्न केले जाऊ शकतात ते सांगितले. या चर्चेत पाकिस्तान वगळता सर्व देशांचे पंतप्रधान सहभागी झाले होते, तेव्हा इम्रान खान हजर राहिले नाहीत, परंतु त्यांची जागा इम्रानचे विशेष सहाय्यक आणि आरोग्य राज्यमंत्री जफर मिर्झा यांनी घेतली. असे करुन पाकिस्तानने स्वत:ला वेगळे दाखवायचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना भारताशी बोलायचं आहे असे वारंवार सांगितले होते पण जेव्हा त्यांना एक व्यासपीठ मिळालं ज्यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला, तेव्हा त्यांनी आपली पाठ दाखविली आणि तेथून पळ काढला. वास्तविक, इम्रान खानने हा निर्णय घेत मोठी चूक केली आहे, त्यांना असे व्यासपीठ मिळाले होते जिथून ते एक नवीन संबंध प्रस्थापित करू शकेल असते. असे असते तर पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान दोघेही समोरासमोर असणे प्रथमच झाले असते आणि कोरोना व्हायरसबाबत चर्चा सुरू असताना पाकिस्तानकडून एक सकारात्मक संदेश आला असता, पण तसे झाले नाही.


ज्यावेळी कोरोनाबद्दल सार्क देशांच्या प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा सुरू होती त्यावेळी इम्रान खान पाकिस्तानातच होते असे असूनदेखील त्यांना चर्चेत भाग घेणे योग्य वाटले नाही उलटपक्षी इम्रानच्या वतीने सामील झालेल्या जफर मिर्झाने या काळात काश्मीरचा मुद्दा उकरत स्वतःचे हसे करुन घेतले. पाकिस्तानच्या या वृत्तीमुळे अनेक वर्षांपासून सार्क परिषद आयोजित केली जात नव्हती. यावेळी या चर्चेत सामील न होता पाकिस्तानने स्वत:चे दरवाजे बंद ठेवण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे.


या चर्चेत भाग न घेता, त्यांनी कुठेतरी न कळतपणे सर्व देशाच्या सदस्यांना हा संदेशही दिला आहे की प्रत्येक आंतरराष्ट्रीय टप्प्यावर तो भारताबरोबर काय बोलत आहे यात काहीच तथ्य राहिलेले नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे, अशा चर्चा किंवा सभांमध्ये भाग घेत असलेल्या ठिकाणी मंत्री किंवा विशेष सहाय्यकांची उपस्थिती देखील त्या सभेच्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. या चर्चेत जेथे पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी निधी तयार केला आणि त्यामध्ये प्रथम हातभार लावण्याची घोषणा केली तेथे पाकिस्तानमधून उपस्थित जफर मिर्झा यांच्याकडे या संकटाविरुद्ध लढण्यासाठी रोडमॅपदेखील नव्हता.


सार्क देशांमध्ये कुठेही आणि केव्हाही जाण्यासाठी भारताचे डॉक्टर सज्ज आहेत हे मात्र पंतप्रधान मोदींनी या चर्चेदरम्यान स्पष्ट केले. भारत कोरोनाच्या संदर्भात आपली सर्व माहिती सर्व सदस्य देशांसह सामायिक करेल. भारताच्या या उपक्रमाचे सर्व सदस्य देशांनी स्वागत केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने