भारतात सर्वधिक बदल्या झालेला दुसरा IAS अधिकारी
पुणे - महाराष्ट्रात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ख्याती आहे, ते जेथे जातात तेथे कोणती ना कोणती मोठी कारवाई करतात. ते राजकीय पुढाऱ्यांना रुचत नाही म्हणून त्यांची एक वर्षाच्या आत बदली केली जाते. हरियाणा सरकारमध्ये असेच एक नाव आहे, ते म्हणजे अशोक खेमका .
यूपीएचं सरकार असताना तत्कालीन सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा गुरगावमधील बेकायदेशीर जमिन खरेदी व्यवहर रद्द करणारे एकमेव प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका हेच होते. याच प्रकरणानंतर खेमका जास्त चर्चेत आले होते.
पुण्यात सजग नागरिक मंचच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमानिमित्त खेमका पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मेट्रो बद्दल जे विचार मांडले , ते मेट्रोचे स्वप्न बघणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.
२८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल ५३ वेळा बदली
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर खोचक ट्विट केल्यानंतर हरयाणातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी यांना नुकतेच एका बदलीला सामोरं जावं लागलं. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर ही बदली होत असून २८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही त्यांची ५३वी बदली ठरली आहे. खेमका यांनी अनेक मोठ्या प्रकरणांचा छडा लावलाय. खेमका ज्या विभागात जातात तेथील गैरव्यवहार, घोटाळे उघडकीस आणतात आणि त्यानंतर लगेचच त्यांची बदली घडवण्यात येत आहे.
करियरच्या सुरुवातीच्या काऩात अशोक खेमका हे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव होते. त्यानंतर त्यांना अभिलेखागार, पुरातत्व तथा संग्रहालय विभागात धाडण्यात आलं आहे. त्यांच्या सततच्या बदल्या ह्या खोचक ट्विटमुळेच झाल्याचे बोलले जात आहे.
'आमदारांचा घोडेबाजार, त्यांचं अपहरण या सगळ्या गोष्टी जनतेच्या सेवेसाठीच केल्या जातात. जनतेच्या सेवेची ही सुवर्णसंधी दवडली जात नाही. त्यापासून वंचित राहिल्यास खूप वेदना होतात. होऊन जाऊ दे लढाई. शेवटी साटंलोटं करूनच जनतेची सेवा केली जाणार आहे' अशा आशयाचं ट्विट खेमका यांनी केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासांतच खेमका यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
तसेच खेमका यांनी बदलीनंतरही एक ट्विट केलं आणि आपलं मन मोकळं केलं. 'आणखी एक बदली. आधी घडलं त्याचीच पुनरावृत्ती. नुकताच देशाने संविधान दिन साजरा केला आणि लगेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. काहीजण निश्चितच आनंदी असतील. प्रामाणिकपणाचं हेच का बक्षीस?' असं ट्विट करत खेमका यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
यूपीएचं सरकार असताना तत्कालीन सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचा गुरगावमधील बेकायदेशीर जमिन खरेदी व्यवहर रद्द करणारे एकमेव प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका हेच होते. याच प्रकरणानंतर खेमका जास्त चर्चेत आले होते.
१९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अशोक खेमका शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. खेमका यांची जिथे जिथे बदली झाली तिथे तिथे त्यांनी शिस्तीचा बडगा उगारला. अनियमिततेविरुद्ध उघड भूमिका घेतली. भ्रष्टाचाराच्याबाबतीत कणखर भूमिका घेतल्याने त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातूनच त्यांच्या सततच्या बदल्यांची मालिका सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा