विद्याताई, हे बोलणे बरे नव्हे !


मुंबई - राष्ट्रवादीच्या  फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्यात सुनेने पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या सुनेवर  गंभीर आरोप  केलाय. तिचे विवाहबाह्य संबंध होते,  असा थेट आरोप करून एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला बदफैली सिद्ध करू पाहत आहे. ते देखील केवळ तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून. अन्य राजकीय व्यक्तींनी स्त्री विषयक अनुद्गार काढले तर टीव्हीवर तासनतास भांडणाऱ्या विद्या बाई आता मात्र सरेआम आपल्याच सुनेच्या इज्जतीचे वाभाडे काढत आहेत. 

मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे  पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा मेहुणा) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून विद्या चव्हाणांसह कुटुंबीय सुनेचा छळ करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. पीडितेला पहिली मुलगी आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा मुलगीच झाल्यानंच विद्या चव्हाण कुटुंबीय पीडितेचा छळ करत होते. पीडित मुलीने विद्या चव्हाण यांच्या घरी ठेवलेल्या तिच्या मौल्यवान वस्तूंचीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

विद्याताई ज्या नेहमीच महिला सन्मान या विषयावर बोलतात पण आज त्या चक्क सुनेचे चारित्र्यहनन करू लागल्या आहेत. एक स्त्री नेता असताना वेगळे बोलते आणि सासू म्हणून वेगळी असते हे विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

सुनेनं तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार देताच 'तिचे विवाहबाह्य संबंध आहेत' आणि तेही अनेक पुरुषांच्या सोबत. असा सरळ आरोप करताना विद्या चव्हाण यांना काहीच वाटले नसावे का? एक स्त्री दुसऱ्या स्त्री ला बदफैली सिद्ध करू पाहत आहे. ते देखील केवळ तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून. अन्य राजकीय व्यक्तींनी स्त्री विषयक अनुद्गार काढले तर टीव्हीवर तासनतास भांडणाऱ्या विद्या बाई आता मात्र सरेआम आपल्याच सुनेच्या इज्जतीचे वाभाडे काढत आहेत ही विकृतीच म्हणावी लागेल.
Post a Comment

Previous Post Next Post