भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ

केज - केज येथील  लोकनेते गोपीनाथ राव मुंडे मागासवर्गीय सहकारी  सूतगिरणीची नोंद करताना बनावट प्रस्ताव केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, केज न्यायालयाचा आदेश अंबाजोगाई जिल्हा व सत्र कायम ठेवल्याने ठोंबरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

केज येथील लोकनेते गोपीनाथ राव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांची लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची नोंद करताना बनावट प्रस्ताव तयार करून तो प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग औरंगाबाद व संचालक वस्त्रोद्योग नागपूर यांच्याकडे प्रस्ताव दाखल करताना गणपती सोनाप्पा कांबळे यांना सूतगिरणीचे संचालक दाखवून त्यांच्या नावासमोर बनावट सह्या करून प्रस्ताव दाखल केला होता.

गणपती सोनाप्पा कांबळे यांना जेव्हा माहिती समजली ते लोकनेते गोपीनाथ राव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत तेव्हा त्यांनी मुख्य प्रवर्तक संगीता ठोंबरे यांची भेट घेऊन विचारणा केली की की, मी तुमच्या संस्थेचा कधी सभासद झालो व संचालक केव्हा झालो यावर संगीता ठोंबरे यांनी गणपती कांबळे यांना विजय प्रकाश ठोंबरे यांना भेटा ते तुम्हाला सर्व काही माहिती देतील असे सांगितले म्हणून गणपती कांबळे यांनी विजय प्रकाश ठोंबरे यांची भेट घेऊन विचारणा केली यावर ठोंबरे म्हणाले आम्हाला जे करायचे ते केले तुला जे करायचे ते कर अशी धमकी दिली म्हणून गणपती कांबळे यांनी केज पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले पण त्यांची फिर्याद घेतली नाही . म्हणून गणपती कांबळे यांनी दिनांक २०/ ८ /१९ रोजी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे लेखी तक्रार केली पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून गणपती कांबळे यांनी दिनांक 3/ ९/ १९ रोजी केज येथील न्यायालयात फौजदारी अर्ज ४७६ / २०१९ गुन्हा कलम ९९,२००,४२०,४६६,४६७,४६८,४७१,४७७,( क ) भादवि नुसार दाखल केली.

  केज येथील न्यायालयाने गणपती कांबळे यांची दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्या आधारे व गणपती कांबळे यांच्या जबाबावरून दिनांक ११/ ९/ 20१९ रोजी सी आर पी सी कलम १५६ नुसार चौकशी करण्याचा आदेश केला होता केज येथील न्यायालयाच्या आदेशा विरुद्ध संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात दिनांक १२/ ९/ 20१९ रोजी  क्रिमीनियर रिव्हिजन ५१ / 20१९ नुसार दाखल केले .

प्रस्तुत प्रकरणात अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधी सौ एस एस सापतनेकर मॅडम यांनी दिनांक २५/ 2/ 2020 रोजी प्रस्तुत प्रकरणात अंतिम बहस केली दिनांक 2/ 3/ 2020 रोजी केज न्यायालयाचा दिनांक ११/ ९/ 20१९ रोजी चा आदेश कायम ठेवला प्रस्तुत प्रकरणात गणपती कांबळे यांच्या वतीने अंबाजोगाई न्यायालयात प्रवीण मेटे यांनी काम पाहिले. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा दणका बसल्याने माजी आमदार संगीता ठोंबरे व पती विजय प्रकाश ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून लोकनेते गोपीनाथ राव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीची चौकशी होणार हे नक्की असून गणपती कांबळे यांनी दाखल केलेला गुन्हा कायम न्यायालयाने ठेवला असून यामुळे मोठ्या अडचणी व संकटात वाढ झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post