फ्लू आणि कोरोना व्हायरस मध्ये नेमका फरक जाणून घ्या.. 

कोरोना वायरस ज्याचे ऑफिशियल नाव COVID-19 असे आहे दुनियाभर हा कोरोना वायरस फारच वेगाने पसरत आहे. अजतागयत खूपच कमी वेळेमध्ये तब्बल एक लाख 20 हज़ार माणसे ह्या अतिभयंकर वायरसच्या विळख्यात अडकलेत तसेच 4000 हून अधिक माणसे केवळ  कोरोना वायरस च्या कारणाने मृत्यूमुखी पडले आहेत.

कोरोना वायरस हे एक वायरल इंफेक्शन खूपच भयंकर आहे यात मुळीच शंका नाही पण कोरोना वायरस बाबतीत समाजात अनेक अफवा पसरत आहेत ज्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या सगळ्यात कोरोना वायरस आणि फ्लू याबाबतीत कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून आम्ही तुम्हाला दोघांमधील फरक सांगणार आहे.
  
जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना वायरसची सुरूवातीची लक्षणे ही फ्लू च्या लक्षणांसारखीच आहेत जसे की, सर्दी - खोकला आणि अंगात ताप भरणे. आणि समाज माध्यमांत परसरणारे फोर्वर्डेड मेसेजेस किंवा अन्य मेसेज यांमधून आपली गफलत होऊ शकते की नक्की कोरोनाची लक्षणे आहेत की प्लू ची लक्षणे आहेत ?  

COVID-19 आणि  फ्लू, दोन्ही वायरल इंफेक्शन  आहेत, जी एका माणसापासून दुसऱ्या माणसाला संक्रमित होत असतात.   आणि ही वायरल इंफेक्शन्स सर्दी आणि खोकल्यावाटे पसरतात. WHO च्या अनुसार  COVID-19 आणि  फ्लूदोन्ही पसरणारे इंफेक्शन्स आहेत. यामुळे श्वासोच्छवासाला अडथळा येणे, , कंजेशन,ताप अशी लक्षणे दिसून येतात. यावर जर वेळीच उपचार नाही झाले तर निमोनिया होऊ शकतो. 

कोरोना वायरस आणि फ्लू ची लक्षण वरकरणी दिसायला सारखीच दिसतातपण हे दोन्ही वेगवेगळ्या वायरसच्या परिवारातून आलेले आहेत. COVID-19, एक नोवेल कोरोनवायरस असून 2019  साली लक्षात आला जो माणसांत पूर्वी कधीच पहायला मिळाला नव्हता तर फ्लू हा यापूर्वीच कित्येक वर्षे माणसांत पहायला मिळालेला होता.

विशेषज्ञांच्या माहितीनुसार,  कोरोना वायरस हा इंफ्लूएंज़ा व इतरवायरसाच्या पेक्षा अधिक वेगाने पसरतो. सर्दी, ताप खोकला यासोबतच प्रचंड ताप यासह थकवा जाणवणे, अंग खूप दुखून येणे व खूपच थंडी वाजणे ही लक्षणे सामान्य फ्लू मध्ये दिसतात. कोरोना वायरसची सुरूवातीची लक्षणेही हीच असल्याने सगळ्यांचा गोंधळ उडतो.त्यामुळे टेस्ट च्या मदतीनेच तुम्हाला समजू शकते की कोरोना वायरस आहे की फ्लू आहे.

फ्लू आणि कोरोना वायरस यांमधील फरक हा तो वायरस झाल्याचे आपल्याला किती काळात समजते त्यावरून, जर फ्लू झाला असेल तर केवळ 2 - 3 दिवसांतच समजू शकते परंतु कोरोना वायरसची लागण झालीये हे समजायला 2 - 14 दिवस लागतात.

फ्लू आजतागायत मोठ्या स्वास्थ्य जोखिमांतील एक वायरस गणला जातो तर डॉक्टर्स आणि वैज्ञानिक हे नोवेल कोरोना वायरस वर अजूनही संशोधनाचा प्रयत्न करतायत. दोन्ही वायरसांच्या उपायांतही फरक आहे, जसे की फ्लू बाबतीत फ्लू वैक्सीनेशन व औषधे दिली जातात तर कोरोना वायरस वरती अजूनपर्यत कुठले औषध शोधले गेलेले नाही.   


Post a Comment

Previous Post Next Post