भाजपाच्या आशिष शेलार यांचे मानसिक संतुलन बिघडले - महेश तपासे

मुंबई  - राज्यात सत्तेपासून दूर रहावे लागल्याने कासावीस झालेल्या भाजपाच्या आशिष शेलार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.


भाजपाचे आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली होती त्याचे सडेतोड उत्तर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता तुम्ही करू नका. कोण बेडूक आणि कोण वाघ-सिंह आहे, हे जनतेला समजले आहे अशा शब्दात महेश तपासे यांनी आशिष शेलार यांचा समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला लगावला होता. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post