पुण्यातील खंडणी प्रकरणात अडकलेले पत्रकार कोण ?

पुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज अडसूळ याचा अटकपूर्व जामीन पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने अडसूळ यास मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून दहा लाख रुपये जप्त केले आहेत. त्यानंतर पुढील तपास सुरु असून, या प्रकरणात अडकलेल्या पत्रकारांची नावे उघड होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

पुण्यातील एका डॉक्टरकडे एक आजारी महिला उपचारासाठी गेली असता, बिलावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सदर महिलेने संबंधित डॉक्टरविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर मनोज अडसूळ याने सदर  डॉक्टरला भीती दाखवून १ कोटी ३० लाखाची खंडणी मागितली. पैकी ७५ लाख वसूल केले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याबरोबर उठबस असलेला पोलीस मित्र जयेश कासट याने चोरावर मोर होत अडसूळकडून पाच लाख खंडणी वसूल केली. अडसूळ आणि कासट यांच्यात खंडणीवरून वाद सुरु झाला. दोघांत  जे सांभाषण झाले त्यात काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांना प्रकरण मिटवण्यासाठी वाटा देण्याची बाब समोर आली.

जेव्हा मनोज अडसूळ विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला, तेव्हा त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्ण जामीनसाठी अर्ज केला होता, त्यात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांचा उल्लेख केला तसेच कासट यास पाच लाखाची खंडणी दिल्याचे कबूल केले. त्यावरून जयेश कासट विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली आणि खंडणीची पाच लाख रक्कम सुद्धा जप्त झाली. त्यानंतर मनोज अडसूळ यास अटक झाली आणि त्याच्याकडून दहा लाखाची खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली.

खंडणी विरोधी पथका समोर जयेश कासट याने काही पत्रकरांची नावे घेतली आहेत. त्यात  स्मार्ट मित्रमधील एक वरिष्ठ पत्रकार, पद्मश्रीच्या पेपर मधील काढून टाकण्यात आलेला सबका बंधू आणि एक रिपोर्टर महाराष्ट्राच्या मानबिंदू मधील एक जण, एका वेबसाईटचा संपादक, काही चॅनल्सचे रिपोर्टर यांची नावे घेतली आहेत. त्यानंतर हे सर्व पत्रकार आपले नाव उघड होऊ नये म्हणून एका जबाबदार मंत्रांच्या मेहुण्याला सांगून यातून सुटका होण्यासाठी धडपड करत आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post