आता काश्मिर होणार शूटिंगचे नंदनवन

काश्मीरला चित्रपट शुटींगचे हब बनविण्याच्या केंद्र सरकाच्या प्रयत्नांना वेग आला असून त्याचे पहिले पाउल म्हणजे जम्मू काश्मीर भागातील बंद पडलेली १८ ते २० चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आउटरिच कार्यक्रमानुसार गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी नुकताच काश्मीर दौरा केला असून फिल्म उद्योगातून काश्मीर मध्ये रोजगार निर्मिती करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

नवीन अधिनियम लागू झाल्यापासून मात्र बॉलीवूड, टॉलीवूड आणि पंजाबी चित्रपट निर्माते शुटींग साठी पुन्हा काश्मीरकडे वळले आहेत. येथे तीन चित्रपटांचे शुटींग नुकतेच केले गेले आहे. श्रीनगरला फिल्म सिटी बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून एका कंपनीने काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात मल्टीप्लेक्स बांधण्यासंदर्भात एक करार नुकताच केला गेल्याचे समजते. टीव्ही मालिका स्टुडीओ उभारणीचे प्रयत्नही केले जात असल्याचे सांगितले जात आहे.


काश्मीरच्या उपराज्यपालांचे सल्लागार फारुख खान यांनी मुंबईला भेट देऊन चित्रपट निर्मात्यांनी फिल्म शुटींग साठी काश्मीरला यावे असे निमंत्रण दिले असून अनेक निर्मात्यांनी त्यांना अनुकूल प्रतिसाद दिला असल्याचे समजते. भारतीय लष्करातर्फे उत्तर काश्मीर मध्ये कौशल विकास केंद्र सुरु झाले आहे. अनेक स्थानिक काश्मिरी युवक तेथे चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेत आहेत. काश्मिरी जनतेत चित्रपटांची क्रेझ पूर्वीपासून आहे मात्र दहशतवादी कारवायामुळे येथील चित्रपटगृहे बंद पडली आहेत आणि बॉलीवूडही काश्मीर पासून दुरावले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने