भाजपने शिवसेनेला फसवले हे खरे आहे - मुनगंटीवार

मुंबई- अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे नेते आणि  माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, भाजपने शिवसेनेला फसवलं अशी स्पष्ट कबुली दिली आहे. मात्र ही चूक भविष्यात सुधारू, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

 ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरलं तो शब्दच भाजपने फिरवला, मात्र अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना टोला लगावताना हे सत्यच समोर आणले. 

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये जे ठरलं होतं त्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी फारकत घेतली. मात्र आपण दिलेला शब्दच मान्य न करणाऱ्या भाजपवाल्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी घरचा आहेर दिला. होय, आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू असे सांगत मुनगंटीवार म्हणाले.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्यांची मैत्री असेल, पण आमची मैत्री 30 वर्षांपासूनची जुनी आाहे. यावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून म्हणून फसवलं, अशी टिप्पणी आली असता होय, आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली, पण आमच्या चुकीचा तुम्ही फायदा घेतला, असा टोमणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना मारतानाच ती चूक एक दिवस आम्ही सुधारू, असे ते  म्हणाले.

एखादा जोतिरादित्य सिंधीया आमच्याकडे पुढील काळात येईल अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. गटशेतीबाबत बोलताना त्यांनी आमचा गट सोडला, तुमचा गट सोडला अशी टिप्पणी केल्याने शिवसेना-भाजप युती तुटली हे मुनगंटीवार यांना सारखे सलत असल्याची चर्चा काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांमध्ये रंगली.

Post a Comment

Previous Post Next Post