भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली

तिरुवनंतपुरम : जगभर हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस भारतात पाय पसरू लागला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. केरळमध्ये कोरोनाचे आणखी पाच आणि तामिळनाडूमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. केरळमधील एकाच कुटुंबातील तीन जणांसह पाच जणांना कोरोनोची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली आहे. 
कोरोनाची लागण झालेल्या या कुटुंबातील तीन जण नुकतेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीहून परतल्यानंतर त्यांना आपल्या काही नातेवाईकांची भेट घेतली. त्यामुळे या तिघांच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोनोबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या पाच जणांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हे करा उपाय 

 • दैनंदिन जीवनात काय काळजी घेऊ शकाल यावर आपल्या प्रियजनांसोबत चर्चा करावी त्यातून काही नवीन उपाय सुचत असतील तर त्याची एक यादी बनवावी.
 • घराजवळील शेजारच्यांसोबत संकटकालीन परिस्थितीत काय करू शकता याबाबतही आराखडा आखावा जेणेकरून ऐनवेळी पॅनिक होणे टाळले जाईल.
 • कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळालोकांपासून अंतर ठेवून राहा.
 • शिंकताना आणि खोकलताना तोंडावर रुमाल ठेवा.तसेच खोकला किंवा ताप असेल तर कोणाच्याही संपर्कात येऊ नका.
 • दिवसभरातून आपले डोळेनाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
 • हात, पाय साबणाने किंवा हँडवॉशने वीस सेंकद वेळेत तरी धुवा.ज्यामध्ये 60 टक्के अल्कोहोल आहे अशा शक्यतो सॅनिटाझरचा वापर करा.
 • सतत टिश्यूचा वापर करा व वापर केल्यावर तात्काळ तो टिश्यू बंद डब्यात फेकून द्या.
 • अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.
 • घरातील लहान मुलांना सर्दी खोकला ताप असल्यास शाळेलाही कळवा.
 • आजारी असेल तर त्यांना क्लासला पाठवणेही बंद करा. घरीच शिकवणी घ्या.
 • आपल्या आप्तस्वकीयांना जर भेटू शकत नसाल तर किमान फोन करून चौकशी करा.
 • लहान मुलांनासुद्धा सकारात्मक वातातरणात ठेवा जेणेकरून त्यांना अशा कोरोनाबाबत भीतीच्या वातावरणात आधार वाटू शकेल

Post a Comment

Previous Post Next Post