मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडल्याचा आरोप करताना प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरेकर म्हणाले, "जरांगे यांना सत्तेची आस लागलेली असून ते महाविकास आघाडीच्या बाजूने वागत आहेत. त्यामुळे मराठा समाज त्यांची नौटंकी सहन करणार नाही."
दरेकर म्हणाले की, "जरांगेंकडे लोकांची गर्दी कमी होत असल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी जेलमध्ये जाण्याची धडपड करत आहेत. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाचा विश्वास गमावलेला आहे. जरांगेंची सुरुवातीची भाषा कुणबी नोंदीच्या संदर्भात होती, ज्यावर सरकारने सकारात्मकता दाखविली होती. परंतु, आता जरांगे महाविकास आघाडीला विधानसभेत कशी मदत होईल, याचा विचार करत आहेत."
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, "जरांगेंच्या आंदोलनाच्या मागणीसंदर्भात चर्चा व्हायला पाहिजे होती, परंतु त्यांनी राजकारणाच्या दिशेने चालविलेल्या खेळीमुळे मराठा समाज नाराज आहे. जरांगेंनी राजेश टोपे यांच्या सोबत केलेल्या बैठकींमुळे त्यांच्या पक्षाचा समर्थन स्पष्ट झाला आहे."
मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दरेकर म्हणाले, "मनोज जरांगे यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. त्यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु या नौटंकीबाज माणसापुढे मराठा समाज झुकणार नाही, कारण त्यांनी विश्वास गमावलेला आहे."
दरेकरांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विषयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल केला. "जरांगे पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांना का विचारत नाहीत? भाजपलाच का सवाल करत आहेत? यातून एकच स्पष्ट होते की, जरांगे यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला आहे," असे ते म्हणाले.
यावेळी दरेकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फूस देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. दरेकर म्हणाले, "मराठा समाजाने जरांगेंच्या खऱ्या हेतूला ओळखले आहे आणि आता समाज दक्ष झालेला आहे."
दरेकरांनी हेही स्पष्ट केले की, "जरांगे राजकारण ओरिएन्टेड झाले असून, ते केवळ फडणवीस यांच्यावर टीका करून चालणार नाही. कोर्टाने नोटीस बजावली असून, जरांगे यांची अहंकाराची भाषा मराठा समाजाला स्वीकार्य नाही."
टिप्पणी पोस्ट करा