चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी सुनील चव्हाण भाजपमध्ये


धाराशिव -  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, श्री तुळजाभवानी साखर कारखाना आणि श्री तुळजाभवानी सूत गिरणीमध्ये झालेल्या  गैरव्यवहाराची चौकशी टाळण्यासाठी  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे ऐन लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेतली. त्यानंतर दोनच दिवसात मधुकरराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार  सुनील चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने संशयाची सुई निर्माण झाली आहे. 


काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव  चव्हाण यांचे पुत्र आणि श्री तुळजाभवानी कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये हा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या पाठोपाठ चव्हाण कुटुंबातील सदस्य भाजपवासी होणार असल्याने धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. 


लोकसभेच्या धाराशिव  मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. त्यात काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्याने महविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर एकटे पडले असून, महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पारडे अधिक मजबूत झाले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात यामुळे  'हाय होल्टेज' लढत असून, अटीतटीचा सामना होत आहे.


दोन दिवसापूर्वी मधुकरराव चव्हाण यांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुनील चव्हाण हे भाजपमध्ये जाणार का याबाबत चर्चा सुरु होत्या. सुनील चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत, त्याचबरोबर ते जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पदावर देखील सक्रिय आहेत.



काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सहभागी झाल्याबद्दल सुनील चव्हाण यांचा सत्कार केला ...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने