व्हाट्स ऍप वापरता ? मग जाणून घ्या काही बदल...
नवी दिल्ली - अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेले व्हाट्स ऍप हे मेसेजिंग एप नेहमीच नवनवीन प्रयोग करत रहाते आणि आपल्या युजर्सना खुश ठेवत असते. नुकतेच व्हाट्स ऍप ने केवळ चॅटपुरते मर्यादित न ठेवता युजर्सना अनेक उपयोगी पडणाऱ्या सोयी चॅटसोबत आणलेल्या आहेत. व्हाट्स ऍप चे नवीन फीचर्स काय आहेत ते जाणून घेऊ.
व्हाट्स ऍप ने भारतात आपली पेमेंट सर्विसची सुरूवात केलेली आहे, आता मेसेज करता करता आपण आपल्या कॉन्टॅक्सना पैसै पाठवू शकणार आहे. हा फीचर Paytm, Google Pay, Amazon Pay च्या धरतीवरच तसेच काम करते. हा पेमेंटचा ऑपशन्स कंपनीने एंडड्राईड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेला आहे. हे फीचर अपग्रेड होण्यासाठी युजर्सना पहिले एप अपडेट करणे जरुरी आहे.
व्हाट्स ऍप चे बहुचर्चित असे Disappearing Messages ऩवे फीचर अखेर रोल आऊट केले आहे. कोणत्याही चॅटसाठी या फीचरला एनेबल करण्यासाठी या ठिकाणी पाठवलेले सर्व मेसेजेस सात दिवसांच्या आत आपोआप गायब होतील, त्यासाठी कुठलेही टाईम लिमिट नसेल. हे नवे फीचर प्रत्येक चॅट विंडो, वैयक्तिक चॅटवर उपलब्ध असेल पण ग्रुप चॅटकरीता याचे अधिकार केवळ ग्रुप ऍडमिनलाच असणार आहेत.
स्टोअरेजची समस्या दर करण्यासाठी व्हाट्स ऍप ने Storage Management tool आणलेले आहे. ज्या फाईल्स अधिक जागा व्यापतात त्या मेसेज, मिडिया फाईल्स समजू शकतील तसेच ताबडतोब तेथेच डिलीट करण्याची सुविधा यामुळे मिळालेली आहे. यासाठी युजर्सना व्हाट्स ऍपच्या सेटिंग्समध्ये जाऊन Storage and Data पर्यायवर जावे लागून मगच योग्य ते बदल करता येतील.
व्हाट्स ऍप कडून आणखी एक नवे फीचर आले आहे ते म्हणजे Aways Mute ऑप्शन फिचर, ज्यामुळे युजर्स कुठल्याही व्हाट्स ऍप अकाउंटला तसेच ग्रुपला कायमचेच म्यूट करु शकणार आहे. आत्तापर्यंत 8 तास, 1 आठवडा, एक वर्ष म्यूटचे पर्याय होते पण आता कायमचेच म्यूट करण्याचा चांगला पर्यायही दिलेला आहे.
तसेच व्हाट्स ऍप ने भारतात Advance Search हा खूपच फायदेशीर फीचर रोलआऊट केला आहे ज्यामुळे युजर्सना व्हाट्स ऍप मध्ये फाईल, फोटो, व्हिडिओ, डोक्युमेंट सर्च कऱणे सोपे जाणार आहे. व्हाट्स ऍप ने त्याच्या सर्चबार मध्ये टाईप करतानाच असे वेगवेगळे पर्याय खुले केले आहेत जेणेकरून युजर्सना एखादी गोष्ट शोधणे अधिक सुकर होणार आहे हे निश्चित.
पुर्ण बातमी दिसत नाही
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा