युनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज झाले स्वस्त
मुंबई -  युनियन बँक ऑफ इंडियाने ३० लाखांवरील गृह कर्जाकरिता व्याजदर १० बीपीएसने कमी केले आहेत. महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार असून अशा प्रकारच्या कर्जासाठी वरील कर्जापेक्षा आणखी ५ बीपीएस सवलत मिळेल. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत गृहकर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. यासोबतच युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे कर्जाचा ताबा घेतला गेल्यास १०,००० रुपयांपर्यंतचे कायदेशीर तसेच मूल्यांकन शुल्क माफ केले जातील.


व्याजदरातील या सवलती १ नोव्हेंबर २०२० पासून लागू झाल्या आहेत. कार आणि शैक्षणिक कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. रिटेल आणि एमएसएमईंना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जदरांनी बँकेतील कमी व्याजदाराचा फायदा घेत कर्जाची संधी साधावी अशी बँकेची अपेक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post