भारताच्या कट्टर दुश्मन देशात दूसरा पुरुष पसंत पडल्यास नवऱ्याला देतात लगेच सोडून ...


अफगाणिस्तानच्या लगतच्या सीमेजवळील पाकिस्तानातील सगळ्यात कमी संख्या असलेली कलशा जातीतील जनता वास्तव्यास आहे. या जमातीत केवळ पावणे चार हजार एवढीच माणसे आहेत. ही माणसे त्यांच्या विचित्र जीवनपद्धती अथवा आधुनिक परंपरा मानणारी माणसे म्हणून ओळखली जातात. जसे की समाजातील एखाद्या स्त्री ला आपला पतीसोडून दुसराच कुणी पुरूष आवडला तर ती सरळ आधीच्या पतीपासून विभक्त होत असते. आता आपण अशा या अतरंगी कलशा जमातीची वैशिष्ट्ये पाहू.


साधारणपणे पाकिस्तानी स्त्रिया ह्या बुर्ख्यातच असतात परंतु अफगाणीस्तान सीमेलगतच्या पाकिस्तानच्या या भूभागातील स्त्रिया तर बिना बुरख्याच्या बिनधास्त व रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करणाऱ्या आहेत. त्या केवळ सुंदर रहात नाहीत तर त्यांना कलाशा समाजाने भरपूर स्वातंत्र्य दिलेले आहे, त्या आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करू शकतात, सगळ्या गोष्टींचे निर्णय स्वत:च घेतात अगदी लग्नासारख्या महत्त्वाच्या बाबतीतही त्यांना स्वातंत्र्य दिलेले आढळते.


कलाशा समुदाय पख्तूनवा प3तातील चित्राल खोऱ्याच्या बाम्बुरात,बिबीब व रामबुर क्षेत्रात वास्तव्यास आहे. हा समुदाय हिंदुकुश पर्वत रांगांनी वेढला गेलाय त्यामुळे त्याचे जीवन व संस्कृती साहजिकचपणे सुरक्षित आहे. या हिंदुकूशबाबत बरेच ऐतिहासिक संदर्भ आहेत, जसे या भागात अलेक्झांडरच्या विजयानंतर त्याला कौकाशोश इन्दुकोश म्हंटले गेले, ग्रीक भाषेत याचा अर्थ हिंदुस्तानी पर्वत असा आहे,त्याला अलेक्झांडरचा वंशज असेही समजले जाते.


येथील लोक  कच्च्या घरात रहातात शिवाय स्त्री-पुरूष एकत्र मिळून सणासुदीला मदीराप्राशन करतात, शिवाय या समुदायाचे लोक प्रत्येक कार्याला संगीताने साज चढवतात तथापि ते अल्पसंख्यांक असल्याने अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या भीतीपोटी संरक्षणार्थ आपल्याजवळ बंदुका व इतर शस्त्रास्त्रे बाळगतात.


कलशा जमातीत पैसा कमवण्याची कामे बहुतांशी स्त्रिया करताना दिसतात, त्या घरी रंगीबेरंगी पर्सेस, हार वगैरै तयार करतात व बाहेर जाऊन पुरुषांना विकायला सांगतात. या समुदायातील स्त्रियांना नटण्या मुरडण्याची विशेष आवड असते, त्यांच्या डोक्यावर खास रंगीत टोपी व गळ्यात माळ असतेच.


कामोस, जोशी व उच्छावल असे तीन सण ते साजरे करतात त्यात कामोस सणाला अधिक महत्त्व असते. डिसंबरच्या सुमारास सर्व जनता एकत्र जमते व तेथेच मुला मुलींची एकमेकांना पसंती होऊन नात्यात अडकतात याशिवाय समुदायात एवढे स्वातंत्र्य आहे की तेथे जर एखाद्या स्त्रिला नवऱ्या व्यतिरिक्त दुसरा पुरूष आवडला तर ती पहिल्याला सोडून नवीन पुरूषासोबत नवी सुरूवात करू शकते.


कलाशा समुदायाच्या अनेक पद्धती खूप विचित्र आहेत त्यात एक म्हणजे नातेवाईकांच्या मरणाचा ते सण साजरा करतात, रडत आक्रोश करत न बसता ते अंतिम क्रियाकर्मावेळी नाच गाण्याचे कार्यक्रम आयोजित करतात, कारण एखादा माणूस हा त्या वरच्याच्या भगवानाच्या कृपेने आला व तसाच निघून गेला अशी त्यांची ठाम समजूत आहे.


जरी आधुनिक समुदाय असला तरी महिलांना पिरियर्डच्या दिवसांत घराबाहेर बसावे लागते, त्या दिवसांत त्यांना अपवित्र समजले जाते आणि जर त्यात त्यांना शिवले तर देव नाराज होतो, ज्यामुळे अवकाळी संकटांचा सामना करावा लागू शकतो अशी त्यांची समजूत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post