फडणवीसांच्या हाती पुन्हा सत्ता द्या, ते आरक्षण देतील याची मी जबाबदारी घेतो : उदयनराजे भोसले


मुंबई  - मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले  यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले. 


देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात करुन दाखवले होते, पण आज त्यांना नावे ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा,’ असे थेट आव्हानच उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिले.


शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचे कामच आजपर्यंत झाले अशी टीकाही उदयनराजे यांनी सरकारवर केली आहे. राजकारणापोटी मराठा समाजाची अनेक प्रश्न प्रलंबित ठेवली आहेत. फक्त राजकारणासाठी मराठा आरक्षणाचा वापर केला जात आहे. मराठा समाजावर ज्यांनी अन्याय केला तेच आता सत्तेत बसले आहेत, अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी ठाकरे सरकारवर केली.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post