शरद पवार यांनी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोनाची लस टोचून घेतली ... त्यावर पवार यांनी दिले स्पष्टीकरण ..




पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोनाची लस टोचून घेतली, अशी  अफवा पसरली होती, त्यावर पवार यांनी  स्पष्टीकरण दिले आहे. मी कोरोनाची कोणतीही लस टोचून घेतलेली नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे बीसीजी इंजेक्शन घेतलं आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं इंजेक्शन घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ही कोरोनाची लस नाही, तर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटला दिलेली ही दुसरी भेट आहे. 1 ऑगस्टला देखील शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन कोरोनावरील लस बनवण्याच काम कसं सुरुय याची माहिती घेतली होती. मात्र शरद पवारांच्या या भेटींमुळे त्यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे शरद पवार बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. 



शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. मी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जातो कारण पुनावाला माझे मित्र आहेत. तसेच लसीची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय हे समजून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो, असंहि पवार यांनी सांगितले  


कोरोनावर लस जानेवारीच्या शेवटपर्यंत येईल

भारतात कोरोनाचा कहर  दिवसेंदिवस वाढत  चालला आहे. देशात ७ महिन्यांत कोरोना दुष्टचक्रात महामारीमुळे एक लाखापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये अमेरिका, ब्राझीलनंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतात पहिला मृत्यू ११ मार्चला कर्नाटकात झाला होता. यानंतर २५,००० मृत्यू १२८ दिवसांत झाले. आता ७५,००० ते १ लाख मृत्यू होण्यासाठी केवळ २२ दिवस लागले आहेत. तथापि, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात ७२ देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. सध्या देशातील ०.५ % लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत शुक्रवारी ११ व्या दिवशी वाढीचा दर शून्यापेक्षा कमी आहे. हा दर सलग १४ दिवस शून्यापेक्षा खाली राहिल्यास हा कोरोनाचा पीक मानला जाईल.

कोरोनावर लस कधी येणार हा सवाल सध्या सर्वांच्याच मनात आहे. भारताचं आणि खासकरुन महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते सीरम इन्सिट्यूटच्या कोरोना लसीकडे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती सीरमनं शरद पवार यांना  दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने