ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीतमुंबई - ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी आज उच्चांकी स्थिती गाठली. फार्मा वगळता सर्व विभागातील निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ०.२८% किंवा ३३.९० अंकांची वृद्धी घेतली व तो ११,९३०.३५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.३१% किंवा १२७.०१ अंकांनी वधारून ४०,६८५.५० अंकांवर पोहोचला. आज जवळपास १०१९ शेअर्स घसरले, १६५६ शेअर्सनी नफा कमावला तर १४२ शेअर्स स्थिर राहिले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात मारूती सुझुकी (४.२६%), एमअँडएम (३.३०%), टाटा स्टील (३.२७%), पॉवर ग्रिड (२.९१%) आणि बजाज ऑटो (२.७९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे अल्ट्रा टेक सिमेंट (२.४४%), एचसीएल टेक्नोलॉजी (१.५९%), हिंदुस्तान युनिलिव्हर (१.५६%), श्री सिमेंट (०.४४%) आणि गेल (१.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्समध्ये समाविष्ट होते.

फार्मा वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी ऑटो क्षेत्राच्या नेतृत्वात सकारात्मक व्यापार केला. हा नफा जवळपास ३ टक्के होता. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.५९% आणि ०.७१% ची वृद्धी केली.

एशियन ग्रॅनिटो इंडियन लि.: फर्मच्या मंडळाने कर्ज किंवा इक्विटी साधनांद्वारे ५:१ स्टॉक स्प्लिट आणि सुमारे ४०० कोटी निधी उभारणीला मान्यता दिली. शेअर्सच्या सब डिव्हिजनला १० रुपये ते २ रुपयांच्या पूर्ण पेड अपला परवानगी दिली. एशियन ग्रॅनिटोचे शेअर्स ५.८४% नी वधारले व त्यांननी २७९.९० रुपयांवर व्यापार केला.

बायोकॉन लि.: बायोकॉन लि.चे शेअर्स २.७२ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ४१७.९५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने सप्टेंबर २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २३.०१ टक्के घट नोंदवल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लि.: कंपनीने तिमाहीत मालमत्तेची गुणवत्ता ढासळण्याबरोबरच घट नोंदवली. कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४६% घसरण झाली. २०२१ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तो २०६ कोटी रुपये होता. कंपनीच्या शेअर्समध्ये ५.५१ टक्क्यांची घट होऊन तिने ८०५.०० रुपयांवर व्यापार केला.

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि.: ई कॉमर्स मधील दिग्गज फ्लिपकार्ट ही कंपनी आदित्य बिर्ला फॅशनमध्ये २०५ रुपये प्रति शेअरनुसार, ७.८ % भागभांडवल १५,०० कोटी रुपयांना खरेदी करत आहे. आदित्य बिर्ला फॅशनचे शेअर्स ७.४९% नी वाढले व त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात १६५.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किरकोळ घसरण घेत ७३.५९ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार: अमेरिकेच्या अतिरिक्त मदतीच्या आशेमुळे साथीने विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूकदारांची जोखिमीची भूक वाढली. नॅसडॅकने ०.१९ टक्के वृद्धी घेतली तर एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीने अनुक्रमे १.४५% आणि० .९९% ची वृद्धी घेतली. निक्केई २२५ ने ०.१८% आणि हँगसेंगने आजच्या व्यापारी सत्रात ०.५४% ची वाढ अनुभवली.

1 Comments

  1. Of course, we now have both FDM as well as|in addition to} SLA printers, so relaxation assured that we’re capable of printing any single or small manufacturing run you would be} need. This is a fascinating repository of 113 3D printer fashions created by NASA. Their STL files are made available free of charge for educational purposes, permitting you to build iconic area exploration objects such because the Apollo 11 landing site, the Curiosity Rover, and the Hubble Space Telescope. Bike Helmets for Kids Registered customers should buy, promote, and download fashions to print on their 3D printers at house.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post