मुंबई - शरद पवारसरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
कर्ज काढणे हे पाप नाही परंतु राज्याचा जीएसटीचा हक्काचा २८ हजार कोटीचा परतावा राज्याला न देणे हे निश्चितच पाप आहे. हक्काचा परतावा राज्याला परत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रयत्न करणार का? आणि केले का? असा सवाल करतानाच पाप आणि पुण्याची परिभाषा देवेंद्र फडणवीससाहेब तुम्ही शरद पवारसाहेबांना समजावू नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.
गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळी गुजरात व केंद्रात भाजपचे सरकार होते तरीसुद्धा भूकंप पीडीतांना मदत करू शकले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद पवारसाहेबांना केले होते. मग तो सरकारचा नाकर्तेपणा होता का? असा खोचक सवालही महेश तपासे यांनी केला आहे.
देशात अनेक कृषीमंत्री झाले मात्र एकमेवाद्वितीय कृषीमंत्री शरद पवार राहिले आहेत ज्यांनी शेतकर्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना सरकार वार्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी जे - जे काही करता येईल ते महाविकास आघाडी करेल याची आठवणही महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करुन दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा