~ निफ्टी ११,६०० आणि सेन्सेक्स मध्ये ३५०अंकांनी वाढ ~
मुंबई - आजच्या व्यापारी सत्रात बँक आणि मिडिया स्टॉक्सच्या नफ्याच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीने ०.१७ % किंवा ८८.३५ अंकांची वृद्धी घेत ११,६४७.६० अंकावर विश्रांती घेतली. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्समध्येही ०.९०% किंवा ३५३.८४ अंकांची वाढ झाली व तो ३९,४६७.६० अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज इंडसइंड बँक (११.७४%), अॅक्सिस बँक (७.७४%), युपीएल (४.८८%), एसबीआय (४.५२%) आणि आयसीआयसीआय बँक (४.४१%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर जेएसडब्ल्यू स्टील (२.८७%), हिरो मोटोकॉर्प (२.३४%), डॉ. रेड्डीज (१.४२%), पॉवर ग्रिड (१.४६%) आणि इन्फोसिस (१.२७%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बँकिंग इंडेक्स ४% नी उसळला तर निफ्टी ऑटो अर्ध्या टक्क्यांनी घसरला. मेटल इंडेक्स लाल रंगात बंद झाला. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५५% ची वृद्धी झाली तर स्मॉलकॅपमध्ये ०.२३% ची घसरण दिसून आली.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज : कंपनीने सांगितले की, त्यांनी यूएसएफडीएद्वारे निर्देशित केलेले उल्लंघन आणि विचलन दूर केले आहेत. आजच्या व्यापारी सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये १.४२% ची घसरण झाली व त्यांनी ४,३७४.०० रुपयांवर व्यापार केला.
एसबीआय :स्टेट बँकेच्या स्टॉक्समध्ये ४.५२%ची वृद्धी झाली आणि क्रेडिट रेटिंग फर्मने शेअरला ‘सेल’ वरून ‘बाय’ मध्ये अपग्रेड केले. त्यानंतर शेअरने २२५.४० रुपयांवर व्यापार केला.
आयसीआयसीआय बँक: आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉक्समध्ये ४.४१% ची वृद्धी झाली. कंपनीने आयसीआयसीआय सिक्युरिटीजची २ टक्के भागीदारी किंवा ६,४४२,००० शेअर ३१० कोटींच्या ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून विकले. त्यानंतर शेअरने ४०९.५० रुपयांवर व्यापार केला.
एनएमडीसी लिमिटेड: कंपनीने नुकतेच नागरनार आयर्न अँड स्टील युनिटच्या डिमर्जरविषयी सांगितले. गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी डिमर्जरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ११.७१% ची वृद्धी झाली व त्यांनी १०७.३५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया : सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७३.३९ रुपयांच्या उच्च पातळीवर स्थिरावला. या आठवड्यात रुपयात १.९% ची वृद्धी झाली, जी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सर्वात मोठी साप्ताहिक वृद्धी होती. यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयात अशा प्रकारची वाढ २०१८ मध्ये दिसून आली होती.
जागतिक बाजारात संमिश्र संकेत: आशियाई आणि युरोपीय बाजारांनी आजच्या सत्रात संमिश्र जागतिक मार्केटचे संकेत दिले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आर्थिक विकासावर जोर देण्यासाठी अमेरिकी धोरण बदलले आणि त्यानंतर अमेरिकी डॉलरमध्ये तेजी आली. नॅसडॅकमध्ये ०.३४% ची घसरण झाली. निक्केई २२५ मध्ये १.४१% घट झाली. तर हँगसेंगमध्ये ०.५६% ची वृद्धी दिसून आली. दुसरीकडे, एफटीएसई १०० मध्ये ०.०२% ची घट झाली. एफटीएसई एमआयबीमध्ये ०.१२% ची वृद्धी झाली.
टिप्पणी पोस्ट करा