बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार

~ निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली ~


मुंबई, १९ ऑगस्ट २०२०: बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५ अंकांची वृद्धी घेतली व तो ११,४०८.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.२२% किंवा ८६.४७ अंकांची वाढ घेत ३८,६१४.७९ वर विश्रांती घेतली.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १६५१ शेअर्सनी वृद्धी घेतली, ९२६ शेअर्सची घसरण झाली तर १०४ शेअर्स स्थिर राहिले. झी एंटरटेनमेंट (१४.०६%), गेल (५.००%). भारती एअरटेल (१.८४%), टेक महिंद्रा (२.२४%) आणि मारूती सुझुकी (१.५४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर बजाज ऑटो (१.२०%), नेस्ले (१.१२%), ओएनजीसी (१.१८%), कोल इंडिया (०.९५%) आणि विप्रो (०.८१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
बँकिंग आणि वित्तीय, ऊर्जा, तसेच इन्फ्रा सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. तर आयटी, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रात नकारात्मक ट्रेंड दिसून आला. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५८% आणि बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.१६% ची वृद्धी दिसून आली.
डॉ. रेड्डीस लॅबोरटरीज लिमिटेड: कंपनीने फुजीफिल्म तोयमा केमिकल कॉ. लिमिटेडबरोबर जागतिक परवाना देण्याच्या कराराचा एक भाग म्हणून एव्हीगन (फेव्हिपीरावीर) २०० मिलीग्राम टॅबलेट भारतात लाँच केल्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ०.५२% ची वाढ झाली व त्यांनी ४,४९७.०० रुपयांवर व्यापार केला.
मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड: मॅन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये ६.४३% ची वाढ झाली व त्यांनी ६४,५५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने सध्याच्या आर्थिक वर्षात अंदाजे ४०५ कोटी रुपयांची निर्यात ऑर्डर मिळवल्यानंतर हे परिणाम दिसून आले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड: आरआयएलचे शेअर्स ०.८७% नी वाढले व त्यांनी २,१३७.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने नेटमेड या ऑनलाइन फार्मसी डिलिव्हरी स्टार्टअपमधील बहुतांश इक्विटी स्टेक संपादित केल्याची घोषणा केली.
सीएसबी बँक लिमिटेड: कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५३.६ कोटी रुपये झाला तर बँकेचे उत्पन्न ७४.३ कोटी रुपये झाले. परिणामी कंपनीच्या शेअर्समध्ये १२.९२% ची वृद्धी झाली व त्यांनी २२५.०५ रुपयांवर व्यापार केला.
एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड: एनएचपीडी चौथ्या फेज अंतर्गत एनएस (0) चौपदरीकरणाच्या प्रकल्पासाठी कंपनीला अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडकडून नियुक्त तारखेसाठी एक पत्र मिळाले. कंपनीच्या शेअर्समध्ये २.५०% ची वाढ झाली तर त्यांनी १९६.९५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: आजच्या सत्रात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने कमकुवत कामगिरी केली. सकारात्मक देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.९३ रुपयांचे मूल्य कमावले.
सोने: डॉलर स्थिर असल्याने आजच्या सत्रात पिवळ्या धातूची किंमत २,००० डॉलर प्रति औसांनी कमी झाली.
जागतिक बाजार: आजच्या सत्रात युरोपियन बाजारपेठेने काहीशी माघार घेतली. तर आशियाई शेअर्सने सात महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली. नॅसडॅकने ०.७३%, एफटीएसई १०० ने ०.१६%, एफटीएसई एमआयबीने ०.४६%, निक्केई २२५ ने ०.२६% ची वृद्धी दर्शवली. तर हँगसेंगने मात्र ०.७४% ची घसरण अनुभवली.

Post a Comment

Previous Post Next Post