शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीने

 निफ्टी ३४.६५ तर सेन्सेक्सने ९९.३६ अंकांनी वाढला


मुंबई, आजच्या व्यापारी सत्रात बँकिंग सेक्टर वगळता बेंचमार्क निर्देशांकांनी सकारात्मक स्थितीत व्यापार करत आठवड्याची सुरुवात तेजीने केली. आयटी, ऊर्जा, धातू आणि एफएमसीजी स्टॉक्नी बाजाराला गती देण्यास मदत केली. निफ्टी ०.३२% किंवा ३४.६५ अंकांनी वाढून तो १९,८०२.७० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.२७% किंवा ९९.३६ अंकांनी वाढला व त्याने ३६,६९३.६९ अंकांवर विश्रांती घेतली.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १११० शेअर्सनी नफा कमावला, १७५ शेअर्स स्थिर राहिले तर १५४३ शेअर्सनी मूल्य गमावले. टेक महिंद्रा (५.५४%), हिंडाल्को इंडस्ट् (३.७९%), एचसीएल टेक्नोलॉजीज (३.७४%), जेएसडब्ल्यू स्टील (३.२६%), आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (३.२३%) हे आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे पॉवर ग्रिड (२.२०%). एचडीएफसी बँक (१.९५%), बजाज फायनान्स (२.१०%), एचडीएफसी (१.७२%) आणि आयसीआयसीआय बँक (१.७२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप यांनी आज फ्लॅट व्यापार केला.
बायोकॉन लिमिटेड: देशात आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी इटोलिझुंबा इंजेक्शन बाजारात आणण्यासाठी बायोकॉन कंपनीला डीजीसीआयची परवानगी मिळाली. या इंजेक्शनचा वापर मध्यम ते गंभीर कोव्हिड-१९ ची लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाईल. कंपनीच्या शेअर्समध्ये ०.१७ टक्क्यांची वाढ होऊन तिच्या शेअर्सनी ४१५.०० रुपयांवर व्यापार केला.
आरआयएल: रिलायन्स इंडस्ट्रिजचे लिमिटेडचे शेअर्स ३.२३% नी वाढले व त्यांनी १९३८.७० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने क्वॉलकॉमकडून जिओ प्लॅटफॉर्मवर ०.१५% भागीदारीसाठी ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. त्यानंतर हे परिणाम दिसून आले.

आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपयाचा व्यापार फ्लॅट झाला आणि त्याने अस्थिर देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७५.१९ रुपयांचे मूल्य गाठले. आजच्या सत्रात कच्च्या तेलाचे दर कमी झाले. अमेरिका आणि जगातील इतर भागात कोव्हिड-१९ रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने हे परिणाम दिसून आले.
जगातील अनेक भागात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढूनही गुंतवणूकदार कमाईच्या हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही युरपियन बाजारासह जागतिक बाजाराने वृद्धी दर्शवली. नॅसडॅकने ०.६६%, तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० कंपनीने अनुक्रमे ०.७१% व १.१९% ची वृद्धी दर्शवली. निक्केई २२५ चे शेअर्स २.२२% तर हँगसेंगचे शेअर्स ०.१७% नी वाढले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने