कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सोन्याच्या दरात वाढ


मुंबई, ७ जुलै २०२०: जगभरातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सोमवारी स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. आर्थिक सुधारणा कालावधी दीर्घकालीन आणि वाढीव असू शकतो या चिंतेने सुरक्षित संपत्ती असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.  तथापि, जगातील दोन सर्ववात मोठ्या अर्थव्यवस्थांनी सकारात्मक आर्थिक वृद्धीची आकडेवारी दर्शवल्यामुळे सोन्याच्या किंमतीतील वाढ मर्यादित राहिली.
अमेरिका आणि चीनमधील उद्योग पुन्हा सुरू झाले तसेच व्यापारात वृद्धीही दिसून आल्याने सोमवारी कच्च्या तेलाचे दर काहीसे वाढले व ४०.५ प्रति बॅरलवर स्थिरावले. जगभरातील घटती मागणी पाहता ओपेक संघटनेतील सदस्य राष्ट्रांनी पुढील काही महिने उत्पादनात तीव्र कपात सुरूच ठेवण्याचे ठरले. सौदी आणि इतर आखाती देशांनीही अधिक तीव्र उत्पादन कपात केल्याने जून २०२० मध्ये ओपेकची तेल उत्पादनाची आकडेवारी मागील दोन दशकांतील सर्वात निचांकी ठरली. तथापि, कोरोना विषाणूवरील उपचारांभोवतीची अनिश्चितता तसेच पुढील महिन्यांती घातक संभाव्य संसर्ग लक्षात घेता, कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्यावर मर्यादा आल्या.
लंडन मेटल एक्सचेंजवरील तेलाचे दर उंचावले. या समूहात निकेल सर्वाधिक नफा कमावणारा ठरला. सरकारी अहवालानुसार, चीनच्या खरेदी व्यवस्थापकांच्या (पीएमआय) मध्ये मे २०२० मध्ये ५०.६ पर्यंत घट दिसून आली. एप्रिल २०२० मध्ये ती ५०.८ एवढी होती. तसेच अमेरिकेतील उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मजबूत घडामोडी नोंदल्या गेल्या. त्यामुळे औद्योगिक धातूच्या सुधारणेच्या शक्यतेत वाढ दिसून आली.
प्रमुख निर्यातक देशांतील खाणी पुन्हा सुरू झाल्या तसेच धातूचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनमधून मागणी वाढल्याने सोमवारी एलएमईवरील कॉपरचे दर १.८५ टक्क्यांनी वाढून ते ६१२८.५ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले.

Post a Comment

Previous Post Next Post