महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोरोनाची बाधा




मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण बाधा झाली असून त्यांना उपचारासाठी  नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन  यांचा कोरोना रिपोर्टही पॉजिटीव्ह आला आहे.

अमिताभ बच्चन  यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. अमिताभ यांची काल (11 जुलै) कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल आज आला आहे.

अमिताभ यांचे ट्विट -
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही बच्चन यांनी केली आहे.


अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे 

 मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे  दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने