अॅग्रीबाजारची शेतक-यांकरिता सुविधा

अॅपद्वारे घरबसल्या करता येणार आपल्या उत्पादनांची विक्री 


मुंबई, ८ जुलै २०२०: भारतातील पहिली खासगी इलेक्ट्रॉनिक अॅग्रीमंडी असलेल्या अॅग्रीबाजार अॅपने कोव्हिड-१९ च्या काळात भारतातील लहान शेत-मालकांच्या प्रतिसादात प्रचंड (४००%) वाढ अनुभवली. हे अॅप शेतक-यांना फोन बटणच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती अपलोड करण्यास तसेच प्रत्यक्ष खरेदी करणा-यांपर्यंत ती पोहोचवण्यास मदत करते. लहान शेतक-यांचे समाधान होण्याकरिता प्लॅटफॉर्मवर खरेदीदार व विक्रेता यांमध्ये थेट वाटाघाटी करून पारदर्शकता पुरवली जाते.
अॅग्रीबाजारचे सहसंस्थापक आणि सीईओ अमित अग्रवाल म्हणाले, “ कोव्हिड १९चा काळ हा भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक कसोटीचा तसेच डोळे उघडणारा काळ ठरला. लहान शेतमालकांना त्यांचे उत्पादन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत योग्यरितीने आणि अधिक वेगाने विक्री करण्यासाठी हे अॅग्री टेक प्लॅटफॉर्म मदत करू शकतात, हे यातून स्पष्ट झाले आहे.आमच्या ई मंडी अॅपवर प्रचंड प्रतिसाद नोंदवला गेला असून भारतीय शेतक-यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेला याचा स्वीकार, हे आमच्यासाठीही आश्चर्यकारक आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण शेतक-यांची गणना करत कृषी मूल्य शृंखला तयार केली जात असल्याने हा ट्रेंड भविष्यात वाढत जाईल, असे दिसते.”
स्थापनेपासून अॅग्रीबाजार अॅप प्लॅटफॉर्मवर १० हजारांपेक्षा जास्त व्यापारी व प्रक्रियाकर्ते, १०० हजारांपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) यांसह देशातील ३६ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील २ लाखाहून अधिक शेतकरी नेटवर्कमध्ये आहेत. उदा. अॅपने प्रधान मंत्री जन कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशभरात ८ दशलक्ष मेट्रीक टन डाळ खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा दिली आहे. स्थापनेपासून अॅपने १४ हजार कोटींचे जीएमव्ही मिळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post