हवेतून प्रसार होणा-या कोव्हिड-१९ वर मात करण्यासाठी 'मॅग्नेटो क्लीनटेक'ची सुविधा


मुंबई, १३ जुलै २०२०: जगभरातील वैज्ञानिकांना विविध संशोधन व अभ्यासातून आढळून आले की, कोरोना विषाणू हा एअरबॉर्न म्हणजे हवेतूनही एका व्यक्तीतून दुस-या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याला मान्यता दिली. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल आणि सर्व प्रकारच्या इनडोअर संस्थानांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मॅग्नेटो क्लीनटेकमध्ये सर्व आव्हाने लक्षात घेत कमर्शिअल एअर प्युरिफिकेशन सिस्टिम तयार करण्यात आली आहे. घातक विषाणूंचा प्रसार आणि धोकादायक सूक्ष्मजीवांसंबंधित जोखीम कमी करण्यात हे उत्तमरित्या परिणाम देत आहेत.
मॅग्नेटो सेंट्रल एअर क्लीनर (एमसीएसी) आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट करण्यात आलेल्या थ्री-स्टेज ‘ट्रॅप अँड किल’ आणि फिल्टर-कम मॅग्नेटिक टेक्नोलॉजीसह येते. हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेसह पर्टिक्युलेट मॅटर आणि धोकादायक किटाणूंना नष्ट करते. नवी आवृत्ती यूव्हीजीआय तंत्रज्ञानाने संचलित असून ती ०.१ मायक्रॉनपर्यंत कणांना ट्रॅप करते. कोव्हिड-१९ विषाणूच्या आकारापेक्षा हा आकार खूप लहान आहे. देशातील प्रमुख कॉर्पोरेशन्स आणि बिझनेस हाऊसेस उदा. जिंदल ग्रुप, फ्रेंच इंटरनॅशनल स्कूल (दिल्ली), इफ्को, ईईएसएल आणि मेदांता हॉस्पिटलमध्ये लॉकडाउनदरम्यान सादर केलेले मॅग्नेटो समाधान आधीपासूनच वापरले जात आहेत.
एमसीएसी कमर्शिअल सेंट्रल एअर प्लोरीफिकेशन सिस्टिमला प्रिमियम ग्राहकांच्या गरजांनुसार कस्टमाइज करण्यात आले आहे. उदा. ताज समूहाचे हॉटेल आणि गोदरेज एअर रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स. येथे साथ येण्यापूर्वीच ही सिस्टिम इन्स्टॉल करण्यात आली होती. तसेच याच्या परिणामांचा अभ्यास करत इनडोअर एअर क्वालिटीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. हेल्दी इनडोअर एअर क्वालिटी के‌वळ धोकादायक विषाणूंपासून बचाव करत नाही तर माणसांची कार्यक्षमता वाढवते. आरोग्यासंबंधी अनेक जटिल समस्या कमी होतात आणि घरातील महागड्या संपत्तीचे संरक्षण करते. भारत एक तरुण देश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post