देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात , प्रवीण दरेकर किरकोळ जखमी
जळगाव-  माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसआणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता   यांच्या ताफ्यातील गाडीला नशिराबाद जवळ किरकोळ अपघात झाला आहे. यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना थोडी दुखापत झाली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते भालोद येथे हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले आहेत. दरम्यान, भालोद येथे जात असतांना नशिराबाद येथे त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. रात्री जोरदार पाऊस सुरू असल्याने ताफ्यातील गाडीला मागच्या गाडीचा धक्का लागला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळाली नसली तरी ताफ्यातील एका गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर हे किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या अपघातात कुणाला फार लागले नाही.

‪नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला...

Posted by Devendra Fadnavis on Wednesday, July 8, 2020

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने