करायला गेला एक अन् झाले काही भलतेच ...

इटलीत चोरून प्रेम करत असताना तो अडकला कोरोनाच्या कचाट्यातनवी दिल्ली - आपण बॉलिवूडचे एक अतिशय प्रसिद्ध गाणे ऐकले असेलच. ज्याचे शब्द असे काहीसे आहेत, प्यार हमें किसी मोड पे ले आया, कि क्या करें हाय कोई तो बताए अब क्या होगा ...अहो, अगदी असेच उद्योग एकाने केलेत, त्या माणसावर हे गाणे एकदम फिट आहे. त्या माणसाने आपल्या बायकोशी खोटे बोलत इटलीला जाऊन दुसर्‍याच बाईशी प्रेमसंबंध फुलवलेत आणि त्यातच त्याला कोरोना व्हायरसने संक्रमित केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनपोठोपाठ इटलीमध्ये सर्वाधिक विनाश झाला असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहेच. असे काहीतरी घडले की, ती व्यक्ती आपल्या पत्नीला व्यवसाय सहलीच्या संदर्भात बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली खरी पण खरी बाब काही वेगळीच होती.
वास्तविकत्या माणसाने आपल्या मैत्रिणीबरोबर इटलीमध्ये वेळ घालवायचा होतापरंतु नशीबा पुढे कुणाचे काहीही चालत नाही असं म्हणतात ते खरं आहे तसेच ह्या माणसाच्या बाबतीत इटलीत घडले.

एका अहवालानुसारत्या व्यक्तीने  आपल्या इटलीच्या छुप्या प्रवासादरम्यान, खोट्या व्यावसायिक सहलीला गेले असताना त्याला स्वत:ला कोरोनाची लक्षणे दिसल्याचे त्याने मान्य केले आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर यासहत्या व्यक्तीने रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कबुली दिली की
, त्याचा एका महिलेशी प्रेम संबंध सुरू आहेत. जेव्हा त्याला तिची ओळख विचारण्यात आली तेव्हा त्याने मैत्रिणीचे नाव घेण्यास नकार दिला.

अहवालात असे म्हटले आहे की, या व्यक्तीने हे कबूल केले आहे की, कोरोना संक्रमण कसे झाले हे आपल्या पत्नीला अजूनही माहिती नाही. दरम्यान, आतापर्यंत या माणसाची प्रकृती स्थिर आहे.मात्र सोशल मीडियावरही अनेक जण या घटनेचा आनंद लुटत आहेत. एक यूजरने यावर असे लिहलेय की, जरी ही व्यक्ती कोरोनाशी लढाई जिंकली असली तरी परंतु जेव्हा त्याला पत्नीच्या सामोरे जावे लागेलतेव्हा त्याची काय खैर नाही, याचा अंदाज आपण न लावलेलाच रा की त्याचे पुढे काय होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post